Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Monday, March 9, 2026

SARA NEWS NETWORK

 


सारा न्यूज नेटवर्क - 

मंद्रूपमध्ये ‘आधार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल’ चे उद्घाटन. 

 ग्रामीण रुग्णांना अत्याधुनिक उपचारांचा आधार..


सोलापूर : - मंद्रूप येथील लोकसेवा शाळेसमोर उभारण्यात आलेल्या आधार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे भव्य उद्घाटन शनिवार (दि. ७ मार्च २०२६) रोजी  मनिष (भैय्या) देशमुख (संचालक, श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती, सोलापूर) यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. 


ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार व अत्याधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने उभारण्यात आलेले हे हॉस्पिटल परिसरातील रुग्णांसाठी मोठा आधार ठरणार आहे.उद्घाटन प्रसंगी बोलताना मनिष (भैय्या) देशमुख म्हणाले की, "मंद्रूपसारख्या ग्रामीण भागातील रुग्णांना ‘आधार हॉस्पिटल'चा मोठा आधार मिळणार आहे. विविध शासकीय आरोग्य योजनांच्या माध्यमातून रुग्णांना उपचारासाठी आर्थिक दिलासा मिळेल.” यावेळी त्यांनी डॉ. योगेश राठोड, डॉ. शीतल राठोड आणि युवराज (भैय्या) राठोड यांच्या पुढाकाराचे कौतुक करत ग्रामीण भागासाठी उभारलेल्या या उपक्रमाबद्दल त्यांचे अभिनंदन केले.


या हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक ICU व क्रिटिकल केअर युनिटसह विविध आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे मंद्रूप व परिसरातील रुग्णांना तातडीच्या उपचारांसाठी शहराकडे धाव घ्यावी लागणार नाही, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment