सारा न्यूज नेटवर्क -
इंगळगी झेडपी शाळेसाठी उद्योजिका अश्विनी हत्तुरे यांच्याकडून एक लाख रुपयांची देणगी..!
सोलापूर :- दि.७- जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत दक्षिण सोलापूर तालुक्यातील इंगळगी येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी व आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी उद्योजिका अश्विनी शिवानंद हत्तुरे यांनी एक लाख रुपयांचा धनादेश शाळेला सुपूर्द केला.
उद्योजिका अश्विनी शिवानंद हत्तुरे यांनी सामाजिक बांधिलकी जपत एक लाख रुपयांची आर्थिक मदत दिली. जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर शाळेच्या प्रगतीसाठी तसेच विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने हा धनादेश शाळा व्यवस्थापन समितीकडे देण्यात आला. शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा दीप्ती निकम, उपाध्यक्ष मनोजा सोनकडे तसेच शाळेचे शिक्षक शेखलाल शेख आणि डॉ. अनिल सर्जे यांच्याकडे हा धनादेश सुपूर्द करण्यात आला. या निधीच्या माध्यमातून शाळेतील पायाभूत सुविधा, शैक्षणिक उपक्रम आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
दक्षिण सोलापूर तालुक्याचे आमदार सुभाषबापू देशमुख यांच्या प्रेरणेतून समाजातील शैक्षणिक संस्थांना बळकटी देण्याच्या उद्देशाने आपण हा निधी दिल्याचे उद्योजिका अश्विनी शिवानंद हत्तुरे यांनी यावेळी सांगितले. अश्विनी हत्तुरे यांच्या या उपक्रमामुळे इंगळगी येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेच्या विकासाला नवी चालना मिळणार असून विद्यार्थ्यांना अधिक चांगले शैक्षणिक वातावरण उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. त्यांच्या या कार्याचे शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक आणि ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात आले.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
.
No comments:
Post a Comment