Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Thursday, March 12, 2026

SARA NEWS NETWORK



सारा न्यूज नेटवर्क - 

सेवानिवृत्त पोलीस प्रतिष्ठान सोलापूर आयोजित विशेष कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सत्कार सोहळा संपन्न.. 


 सोलापूर (प्रतिनिधी) :- दिनांक १०/३/२०२६ रोजी श्री द्वारकाधिश मंदिर सभागृह जुळे सभागृह येथे सकाळी १०:३० वा. पासून २ वा पर्यंत  सेवानिवृत्त पोलीस प्रतिष्ठान सोलापूर आयोजित आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून विशेष कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सत्कार सोहळा संपन्न झाला. 


डॉक्टर अश्विनी पाटील मा.पोलीस उपायुक्त  सोलापूर शहर यांच्या शुभहस्ते ,जेष्ठ व श्रेष्ठ साहित्यिका डॉक्टर नसीम पठाण यांचे अध्यक्षतेखाली, महानगरपालिका सोलापूर  उपमहापौर सौ ज्ञानेश्वरी  देवकर व प्रभाग २६ च्या नगरसेविका सौ संगीता जाधव यांचे उपस्थितीत हा सत्कार सोहळा दिमाखात संपन्न झाला. 


कार्यरत पोलीस ,पोलीस कुटुंबीय आणि सामाजिक, सांस्ऱ्कृतिक, आध्यात्मिक  अशा विविध क्षेत्रातील विशेष कर्तृत्व बजावणाऱ्या महिलांचा सन्मानपत्र, सन्मानचिन्ह व तेजग्यान फौंडेशन हॅप्पी थॅाटस् या आध्यात्मिक संस्थेचे संस्थापक तेजगुरू सरश्री लिखित पुस्तके असे प्रदान करून सत्कार  करण्यात आले. सत्कार स्विकारतांना सत्कारमूर्तीचा आनंद ओसंडून वहात होता. कांहीजणी भाऊकही झाल्या होत्या.

डॉक्टर अश्विनी पाटील पोलीस उपायुक्त सोलापूर शहर यांनी मार्गदर्शन करताना महिलांनी आपले आरोग्य सांभाळावे असे आपल्या मेडिकल डॅाक्टर डिग्रीनुसार उपाय सुचविण्यास विसरल्या नाहीत याचे उपस्थीतांना खूप कौतुक वाटले. आणि कर्तव्य बाहुल्यानुसार डिजिटल अरेस्ट गुन्हे घडतात ते कशा प्रकारे घडतात लोक विशेषत: जेष्ठ नागरिक, सेवानिवृत्त हे या गुन्हेगारांचे टारगेट कसे ठरतात व ठरले जाऊन कोट्यावधीपर्यंतच्या आयुष्याची पुंजी कसे गमावून बसतात हे उदाहरणे देवून समजावले.त्यापासून कसे सावध राहावे याचे खूप सविस्तर प्रबोधन  आणि मार्गदर्शन केले.


नगरसेविका सौ संगीता जाधव यांनी आपल्या मनोगतात 8 मार्च महिला दिनाचे महत्व आणि आजची गरज याबाबत संबोधित केले. 


अध्यक्ष पदावरून बोलतांना डॅा. नसिम पठाण यांनी Right’s ,  Justice,Action for All women and girls. Give to Gain या थीमनुसार कार्यक्रमाची आखणी असल्याचे सांगून सर्वांचे कौतुक करीत ज्येष्ठांचे विशेषत: आज्जीचे कुटुंबातील सन्मानाचे स्थान टिकले पाहिजे. कुटुंबव्यस्थेच्या आधारवडाचा दर्जा घसरतां कामा नये असे आवर्जून कानपिचक्या देत समजावले.

सौ ज्ञानेश्वरी देवकर उपमहापौर सोलापूर महापालिका या पोलीस अधिकारी यांच्या स्नुषा आणि पहिल्याच प्रयत्नात निवडणुक जिंकून- उपमहापौर-राजकीय कारकिर्दीस नेत्रदिपक सुरूवात आणि म्हणून त्यांची सेवानिवृत्त पोलीस प्रतिष्ठान सोलापूर आयोजित आंतरराष्ट्रीय महिला दिन कार्यक्रमास उपस्थीती सुखावून गेली.त्यांचाही सत्कार पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील व डॅा नसिम पठाण यांच्या हस्ते करण्यात आला. 



पुरस्कार प्राप्त सन्माननीत कर्तृत्ववान महिला

*श्रीमती प्रियंवदा विजयकुमार जाधव पोसई सोलापूर ग्रामीण.

*श्रीमती अनिता कवडे जाधव पोसई सोलापूर शहर.

*भजन शिक्षक वैशाली विलास देशपांडे विरंगुळा जेष्ठ नागरिक संघ जुळे सोलापूर सभासद.

*सोलापूर महापालिका शाळा आदर्श शिक्षिका सविता दामोदर जाधव सध्या नेमणुक शाळा नं २६. 

*गीतांजली कटकधोंड योगा शिक्षिका व उद्दोजिका के आर स्टुडियो आणि बिजनेस ग्रुप आणि सेवा नि. पो. निरीक्षक यांची कन्या.

*भारतातील सर्वात लहान फिल्म डायरेक्टर इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झालेली कार्यरत महिला हवालदार यांची कन्या कु. तेजस्वीनी रवींद्र जोगदंड. 

*आर्ट ऑफ लिविंग च्या ध्यानाने आरोग्य व शाश्वत विकास होतो या विषयावर उपक्रम करणाऱ्या 

सौ प्रमिला सुनील पतंगे से.नि. पोलीस हेड क्लार्क यांच्या पत्नी.

*प्रशिक्षका शिवाय उत्कृष्ट हार्मोनियम वादन शिकून 

प्रभागातील महिलांच्या सहभागाने 

भजनी मंडळ भजन संध्या चालवणाऱ्या मंगल बाळासाहेब उन्हाळे से.नि. पोलीस यांच्या पत्नी. 

*विशेष कौतुक सन्मान 

सर्वोत्तम आराम आणि संरक्षण याचे धडे देऊन उच्च दर्जाचे सॅनेटरी पॅड वर विश्वास ठेवा 

आरोग्य आणि स्वच्छता राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे याचा प्रचार व प्रसार करणाऱ्या सौ सुनंदा सुरेश कुंभार से.नि. पोलीस यांच्या पत्नी.

*महापालिका सोलापूर माजी आदर्श नगरसेविका पुरस्कार प्राप्तनगरसेविका सौ राजश्री अनिल चव्हाण से नि. पोलीस यांच्या पत्नी.

*समस्त मातांनो! आपले काम संपल्यावर मोबाईलमध्ये वेळ न घालवतां मुलींना वेळ द्या तरचआपल्या मुलीं रणरागिनी झाशीची राणी बनतील, लता मंगेशकर बनतीलअसे आवाहन करणारी इयत्तेत ४थी ची हचिमुकली कु. पुनवश्री रितेश झुंजारे से. नि.पोलीस यांची नात. 

*सूत्र संचलनात मदत करणारी कु सानिका कुंभार से.नि.पोलीस यांची कन्या.

*श्री द्वारकाधीश मंदिरात विनामूल्य निरंतर सेवा देणाऱ्या आणि सोलापूर जिल्हा वारकरी संप्रदाय महिला भजनी मंडळाच्या अध्यक्षा सौ लता दत्तात्रय पाठक विरंगुळा जेष्ठ नागरिक संघ सभासद.

*वयाच्या ६५ व्या वर्षी “संगित विशारद” पदवी प्राप्त करणाऱ्या श्रीमती सुरेखा गंभीर विरंगुळा जेष्ठ नागरिक संघ जुळे सोलापूर सभासद.

  या सर्वांचा मान्यवरांच्या हस्ते 

सत्कार करण्यात आला 

संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन 

सेवानिवृत्त पोलीस अधिकारी 

सौ मीनाक्षी पेठे “राज्य समन्वयक सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कर्मचारी शिखर संस्था महाराष्ट्र राज्य पुणे” .उपाध्यक्ष ,सेवानिवृत्त पोलीस प्रतिष्ठान सोलापूर  आणि  संचालिका करुणा झुंजारे यांनी केले.


सेवानिवृत्त पोलीस प्रतिष्ठान सोलापूरचे अध्यक्ष अनिल उकरंडे आणि संचालक श्री सुरेश कोठे, विरंगुळा जेष्ठ नागरिक संघ जुळे सोलापूर अध्यक्ष श्री बटगेरी सर सचिव श्री बाळासाहेब पाटील, पदाधिकारी श्री विठ्ठल भोसले आदि आणि मंदिर व्यवस्थापक मा. दत्तात्रय पाठक यांनी उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करण्यात सहकार्य केले. 

आभार प्रदर्शन संचालिका श्रीमती करूणा झुंजारे यांनी केले.

कार्यक्रमास मोठ्या संख्येने 

पोलीस कुटुंबीय महिला, भजनी मंडळ महिला,विरंगुळा ज्येष्ठ नागरिक संघाच्या महिलासदस्य तब्बल तीन तास शांततेत उपस्थीत राहून खेळीमेळीच्या वातावरणात, हस्याचे फवारे उडवीत कार्यक्रम संपन्न झाला

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे 




No comments:

Post a Comment