Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Saturday, March 7, 2026

SARA NEWS NETWORK



 सारा न्यूज नेटवर्क - 

जेऊर जिल्हा परिषद मराठी शाळा येथील विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल सयाजी राजे वॉटर पार्क येथे उत्साहात संपन्न . 

सोलापूर :- जिल्हा परिषद मराठी शाळा जेऊर  येथील शाळेतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल नुकतीच मोठ्या उत्साहात पार पडली. शाळेतील इयत्ता दुसरी ते चौथीच्या विद्यार्थ्यांना सयाजी राजे वॉटर पार्क अकलूज येथे शैक्षणिक सहलीसाठी नेण्यात आले होते. या सहलीमुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच आनंददायी आणि अविस्मरणीय अनुभव मिळाला.

सकाळी शाळा परिसरात शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, इरण्णा चौलगी उपाध्यक्ष, कमलाबाई स्वामी  सदस्य व पालकवर्ग  यांच्या उपस्थितीत सहलीसाठी जाणाऱ्या लालपरी महामंडळ बसचे पूजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वाहनाला हिरवा झेंडा दाखवून उत्साहात प्रस्थान करण्यात आले.



सहलीदरम्यान विद्यार्थ्यांनी वॉटर स्लाईड, स्विमिंग पूल  झोका बोटिंग पाळणा शिवसृष्टी किल्ला तसेच इतर विविध जलक्रीडा व मनोरंजनाच्या साधनांचा मनमुराद आनंद घेतला. या सहलीमुळे विद्यार्थ्यांमध्ये मैत्रीभाव, सहकार्याची भावना आणि शिस्त यांचा विकास होण्यास मदत झाली.

सहलीपूर्वी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सुरक्षिततेचे नियम, शिस्त व स्वच्छतेचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले. संपूर्ण सहलीदरम्यान शिक्षकांनी विद्यार्थ्यांवर बारकाईने लक्ष ठेवून त्यांची योग्य काळजी घेतली.


या सहलीच्या आयोजनामध्ये मुख्याध्यापक अमसिध्द उमराणी महादेव सोनार नागप्पा आळगी संगमेश्वर कोणदे  उर्मिला शिवगुंडे स्नेहलता क्षीरसागर सुमित्रा जमादार संध्याराणी माने तसेच इतर पालकवृंद यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या योग्य नियोजनामुळे ही सहल अत्यंत यशस्वी ठरली. विद्यार्थ्यांनी आनंदी वातावरणात विविध उपक्रमांचा अनुभव घेतला.

सहल संपल्यानंतर सर्व विद्यार्थी आनंदी आणि उत्साही वातावरणात सुरक्षितपणे शाळेत परतले. ही सहल विद्यार्थ्यांसाठी आनंददायी, ज्ञानवर्धक आणि कायम स्मरणात राहील अशी ठरली.

 सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे 

No comments:

Post a Comment