सारा न्यूज नेटवर्क -
सन्मान नारीचा.. नारी शक्तीचा..!
उपमहापौर ज्ञानेश्वरी ताई देवकर यांनी सोलापूरच्या पहिल्या महिला बॉडी बिल्डर पूजाचा केला सन्मान...
सोलापूर :- तरुण भारत व्यायाम मंडळाने राज्य अजिंक्यपद महाराष्ट्र श्री बॉडी बिल्डिंग स्पर्धा सांगली या ठिकाणी आयोजित केली होती . आपल्या सोलापूरची पहिला महिला बॉडी बिल्डर पूजा गटटू हिने सहभाग नोंदविला . महिला बॉडी बिल्डिंग प्रकारात राज्यात पाचवा क्रमांक पाप्त केला.
सोलापुरातील कोनापूरे चाळीतील पूजाच्या घरी जावून उपमहापौर ज्ञानेश्वरी ताई यांनी सत्कार केला. तिच्या यशाचे व धाडसाचे कौतुक केले.
पूजाच्या यशात तीच्या आईचा मोठा सहभाग आहे. त्यामुळे पुजाच्या आईचाही सन्मान उपमहापौर यांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी बॉडी बिल्डिंग संघटनेचे सरचिटणीस विशाल गायकवाड, भाजपचे दक्षिण मंडल अध्यक्ष महेश देवकर, माजी नगरसेविका वैष्णवी ताई करगुळे , सुजताताई सुतार आदी उपस्थित होते.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे



No comments:
Post a Comment