Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Monday, March 16, 2026

SARA NEWS NETWORK

 


सारा न्यूज नेटवर्क - 

गुढीपाडवा पासून श्री दिगंबर मुनीनाथ महाराज यांची ५०  व्या पुण्यतिथी महोत्सवास प्रारंभ.. 


सोलापूर :- दिनांक १६/३/२०२६ श्री दिगंबर मुनीनाथ महाराजांचे ५० वी पुण्यतिथी महोत्सव गुढीपाडवा म्हणजेच चैत्र शुद्ध प्रतिपदा दिनांक १९/०३/२०२६गुरुवार रोजी प्रारंभ होणार असल्याचे माहिती उत्सव समितीचे अध्यक्ष नागार्जुन कुसुरकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे 

    श्री दिगंबर मुनीनाथ महाराजांची ५०वी पुण्यतिथी महोत्सव १९/०३/२०२६ ते २६/०३/२०२६ पर्यंत धार्मिक,सार्वजनिक, सामाजिक अशा विविध कार्यक्रमाद्वारे साजरी होणार असून या महोत्सवात काकडाआरती,गीता पारायण,ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ,प्रवचन,भारुड, भजन,कीर्तन,महापूजा,महाआरती,महाप्रसाद,जलकुंभाभिषेक,विश्वशांती,  महायज्ञ व इतर कार्यक्रमाद्वारे साजरी होणार आहे. 


                     श्री दिगंबर मुनीनाथ महाराज

                          गुरुमाऊली श्री सुशीलम्मा

या पुण्यतिथी महोत्सवात ह.भ.प.आनंद गुजर, ह.भ‌.प.विठ्ठल वल्लमदेशी,राकेश अन्नम महाराज, ह.भ.प.अंजय्या दुस्सा, ह.भ.प. सिद्राम पोला,ह.भ.प.मारुती जिंदम, ह.भ.प.नर्सिंग बिर्कुर,ह.भ.प.अशोक चिट्ठ्याल, ह.भ.प.मोहन कुरापाटी महाराज त्याचबरोबर श्री कल्याणम वेंकटदास भजनी मंडळ,श्री सिद्धारूढ भजनी मंडळ,श्री ओंकार भजनी मंडळ,श्री श्रमजीवी भजनी मंडळ,श्री भावनाऋषी भजनी मंडळ, श्री दिगंबर मुनिनाथ भजनी मंडळ यांचे कार्यक्रम होणार आहेत दिनांक २६/०३/२०२६ रोजी महापौर श्री विनायक कोंड्याल यांच्या हस्ते महाआरती व महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. 


   वरील सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उत्सव समितीचे अध्यक्ष नागार्जुन कुसुरकर,उपाध्यक्ष श्रीकांत कुसुरकर,उपाध्यक्ष विशाल चिलवेरी,कार्याध्यक्ष विक्रम कारमपुरी,सेक्रेटरी मुनीनाथ कारमपुरी यांच्यासह दशरथ नंदाल विष्णू चिलका,दिनेश पिसका,बालाजी कोटा, अक्षय नंदाल,रेणुका येरगुंटला,अनुसया कारमपुरी, सुनंदा कुसुरकर, सुनीता कारमपुरी,कलावती कुसुरकर यांच्यासह श्री दिगंबर मुनिनाथ महाराज भक्त मंडळ व श्री सुशीलम्मा भक्त मंडळ यांनी विशेष परिश्रम घेणार आहेत

       तरी भाविक भक्त बंधू-भगिनींनी या पुण्यतिथी महोत्सवात उपस्थिती राहून श्रवणाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री दिगंबर मुनीनाथ सांस्कृतिक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष विष्णू कारमपुरी (महाराज)यांनी केले आहे.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे 

No comments:

Post a Comment