Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Friday, March 20, 2026

SARA NEWS NETWORK

 


सारा न्यूज नेटवर्क - 

सोलापूर शहर गुन्हे शाखेची उल्लेखनीय कामगिरी, आंतरराज्यीय दोन मोटार सायकल चोरांना अटक,

 1 लाख 75 हजार किंमतीच्या ०६ मोटार सायकली हस्तगत..


सोलापूर (प्रतिनिधी) :- सोलापूर शहरात मोटार सायकल चोरीचे गुन्हे सातत्याने घडत असल्याने, सदरचे गुन्हे उघउकीस आणणेबाबत, पोलीस आयुक्त एम राजकुमार, डॉ. अश्विनी पाटील पोलीस उपआयुक्त गुन्हे, सहा.पोलीस आयुक्त राजन माने यांनी सदरचे गुन्हे उघडकीस आणणे बाबत गुन्हे शाखेस आदेशीत केले होते. त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा अरविंद माने यांनी गुन्हे शाखेचे सर्व अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शक सुचना केल्या होत्या. त्याअनुषंगाने सोलापूर शहर गुन्हे शाखेचे सहा.पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर व त्यांचे पथकातील पोलीस अंमलदार हे सी.सी.टी.व्ही फुटेजचे तांत्रीक विश्लेषण करुन, मोटार सायकल चोरी करणा-या गुन्हेगारांचा शोध घेत होते.

दि. १९/०३/२०२६ रोजी सपोनि शैलेश खेडकर व पथकातील पोलीस अंमलदार हे कर्तव्यावर असताना, पोलीस अंमलदार विनोद रजपूत यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, " चोरी केलेली मोटार सायकल क्रमांक एम.एच.१३ डी.पी. १९२७ ही हिरो स्प्लेंडर प्लस कंपनीची मोटार सायकल घेवून, कर्नाटकातील दोन इसम गंगामाई हॉस्पीटल परिसरात थांबलेले आहेत." त्याअनुषंगाने सपोनि शैलेश खेडकर व पथकाने तात्काळ सदर ठिकाणी सापळा लावून, एम.एच.१३ डी.पी. १९२७ या मोटार सायकलवर परिसरात फिरत असलेल्या दोन संशयीत इमसांना गंगामाई हॉस्पीटल परिसरातून ताब्यात घेतले. त्यास त्यांची नावे व पत्ते विचारले असता, मोटार सायकल चालविणा-या इसमाने त्याचे नाव प्रमोद अर्जुन जेऊर वय २१ वर्षे, व्यवसाय शिक्षण, रा. अतारगा ता. इंडी जि. विजयपुर राज्य कर्नाटक व पाठीमागे बसलेल्या इसमाने त्याचे नाव अमोल भाऊसाहेब चव्हाण वय-२६ वर्षे, व्यवसाय :- शिक्षण, रा. जाधव वस्ती, आरकेरी, ता. विजयपुर जि. विजयपुर राज्य कर्नाटक असे असल्याचे सांगितले. पथकाने त्यांना त्यांचे ताब्यातील मोटार सायकलच्या मालकी बाबत व कागदपत्रांबाबत चौकशी केली असता, ते उडवा-उडवीची उत्तरे देत होते, त्यामुळे पथकाचा दोघांवर संशय बळावला. ताब्यातील इसमांना अधिक विश्वासात घेवून चौकशी केली असता, त्यांनी त्यांचे ताब्यातील मोटारासयकल ही, दि. ०४/०१/२०२६ रोजी सोलापूरात येवून, सात रस्ता येथील एका हॉस्पीटलचे समोरुन चोरल्याची कबूली दिली व आज देखील दोघे मोटार सायकल चोरण्याच्या उददेशानेच सोलापूरात आले होते, असे त्यांनी सांगितले. सदर मोटार सायकलचे चोरीबाबत, सदर बझार पो.स्टे सोलापूर शहर येथे गुन्हा रजि नं. ०६/२०२६, भा.न्या.सं.२०२६ कलम ३०३ (२) प्रमाणे मोटार सायकल चोरीचा गुन्हा दाखल असल्याची व तो गुन्हा त्या दोघांनी मिळून केल्याची खात्री झाली. सदर आरोपी हे परराज्यातील असल्याने, पथकाने त्यांना अधिक विश्वासात घेवून तपास केला असता, त्यांनी मागील सहा महिन्यात सोलापूर शहरातून आणखी ०५ मोटार सायकली चोरल्या असल्याची माहिती दिली. त्यामुळे सपोनि श्री. शैलेश खेडकर यांनी त्या दोघांना वरील नमुद गुन्हयात अटक केली, तपासामध्ये आरोपींनी आणखी ०५ मोटार सायकली त्यांनी जेऊर, जि. विजापूर, राज्य कर्नाटक येथून काढून दिल्या आहेत. अशा प्रकारे शहर गुन्हे शाखेकडून मोटार सायकल चोरीचे 06 गुन्हयातील एकूण 1,75,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करुन उत्तमप्रकारे कामगिरी केली आहे.

सदरची कामगिरी मा. श्री. एम. राजकुमार, पोलीस आयुक्त, सोलापुर शहर, डॉ. अश्विनी पाटील, पोलीस उपायुक्त, गुन्हे, श्री. राजन माने, सहा. पोलीस आयुक्त गुन्हे तसेच श्री. अरविंद माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली, गुन्हे शाखेकडील नेमणुकीचे स.पो.नि. श्री. शैलेश खेडकर व पथकातील पोलीस अंमलदार संदीप जावळे, विनोद रजपुत, राजकुमार पवार, इम्रान जमादार, उमेश पवार, राजेश मोरे, सिध्दाराम देशमुख, अजय गुंड, महेश रोकडे, मंजूनाथ मुत्तनवार, दत्तात्रय सूळ, प्रमोद गायकवाड, चालक मृण्यम सावंत, छोटेसाहेब जहागिरदार, तसेच सायबर पो. स्टे कडील प्रकाश गायकवाड व मच्छिंद्र राठोड यांनी केली आहे.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment