सारा न्यूज नेटवर्क -
क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन; पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती
सोलापूर (प्रतिनिधी) :- शिक्षणाची ज्योत पेटवणारे आणि समतेचा संदेश देणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त सोलापूर शहरात विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. फुले यांच्या कार्याचा गौरव करत उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या विचारांना उजाळा दिला. शिक्षणाशिवाय समाजाची प्रगती अशक्य आहे, हा फुले यांचा संदेश आजही तितकाच मार्गदर्शक असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या कार्यक्रमास पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी आमदार दिलीप माने, पक्ष नेते नरेंद्र काळे, नगरसेविका श्रीदेवी फुलारे, क्रांतीसूर्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आदर्श धडे यांच्यासह अनेक मान्यवर, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षण, शेतकरी, कामगार आणि वंचित घटकांसाठी आयुष्यभर केलेल्या संघर्षाचे स्मरण यावेळी करण्यात आले. त्यांचे विचार पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी अशा कार्यक्रमांची गरज असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.


No comments:
Post a Comment