सारा न्यूज नेटवर्क -
सोलापूर हळहळले! युवा समाजसेवक विजय जाधव यांचे अपघाती निधन; DRM कार्यालयासमोर काळाचा घाला
सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर शहरातील परिचित युवा समाजसेवक तथा गिरीकर्णिका फाउंडेशनचे अध्यक्ष विजय कुंदन जाधव यांचे शनिवारी मध्यरात्री दुर्दैवी अपघातात निधन झाले. शनिवारी साधारण साडेअकरा ते बाराच्या दरम्यान डीआरएम कार्यालयासमोर दुचाकीला अपघात होऊन डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
विजय जाधव हे गिरीकर्णिका फाउंडेशनचे अध्यक्ष तसेच सोलापूर विकास मंचचे सदस्य होते. विविध सामाजिक आणि नागरी प्रश्नांचा अभ्यास असलेल्या जाधव यांनी सोलापूर जिल्ह्याचे तापमान कमी करण्याच्या उद्देशाने ‘मिशन ३८’ हा उपक्रम सुरू केला होता.
सोलापूरच्या विमानसेवा, बेरोजगारांना रोजगार, उड्डाणपूल यांसह विविध प्रश्नांवर त्यांनी सातत्याने आवाज उठवला. शासन दरबारी नागरिकांच्या समस्या मांडत सामाजिक कार्यात सक्रिय योगदान दिले.
त्यांच्या आकस्मिक निधनाची बातमी समोर येताच सोलापूर शहरातील सामाजिक, राजकीय आणि विविध क्षेत्रांतून हळहळ व्यक्त होत असून, सर्वत्र शोककळा पसरली आहे.

No comments:
Post a Comment