सारा न्यूज नेटवर्क -
मुळेगाव तांडा येथे विद्यार्थ्यांसाठी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन;
चिंतामणी माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेत तालुका पोलिस स्टेशन पोलीसांकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन..
दक्षिण सोलापूर - प्रतिनिधी
चिंतामणी माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा, मुळेगाव तांडा, ता. दक्षिण सोलापूर येथे विद्यार्थ्यांसाठी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात सोलापूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा. गावडे साहेब यांनी विद्यार्थ्यांना व्यसनमुक्ती, सायबर फसवणूक आणि ट्रॅफिकचे नियम याबाबत सविस्तर समुपदेशन केले. सध्याच्या काळात वाढते सायबर गुन्हे, व्यसनाचे दुष्परिणाम आणि वाहतुकीच्या नियमांचे महत्व याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
या प्रसंगी पोलीस उपनिरीक्षक बागवान साहेब, पोलीस पाटील अश्विनी राठोड, शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि मुख्याध्यापक / प्राचार्य रमेश राठोड उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. बनसोडे सर यांनी केले.





No comments:
Post a Comment