Sara News Network

मुख्य संपादक - डॉ.राम हुंडारे

Thursday, September 17, 2026

SARA NEWS NETWORK

सारा न्यूज नेटवर्क - 



 कामशेत येथे सामूहिक अथर्वशीर्ष पठण कार्यक्रम उत्साहात संपन्न; 

लकी ड्रॉमध्ये निर्मला बाप्पू शिळवणे प्रथम क्रमांकाच्या मानकरी


कामशेत (प्रतिनिधी) :- ओम साई मित्र मंडळ, कामशेत व श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्था, शाखा कामशेत यांच्या संयुक्त विद्यमाने ऋषिपंचमीच्या पावन दिनानिमित्त सामूहिक अथर्वशीर्ष पठण कार्यक्रमाचे आयोजन मंगळवार, दि. १५ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ८ वाजता, श्री विठ्ठल मंदिर, गावठाण, कामशेत-खडकाळे येथे करण्यात आले.



श्री गणरायाच्या भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात सामूहिक अथर्वशीर्ष पठण करण्यात आले. या कार्यक्रमाला भाविक, सभासद व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. धार्मिक संस्कारांसोबतच सामाजिक एकोपा व बंधुभाव वाढावा, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.



कार्यक्रमाच्या निमित्ताने सहभागींसाठी लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले होते. या लकी ड्रॉमध्ये प्रथम क्रमांक निर्मला बाप्पू शिळवणे यांनी पटकावला. प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल त्यांचे आयोजकांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष श्री. शरद बबनराव भोंगाडे, तसेच सचिव श्री. अतुल चंद्रकांत राऊत यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच *श्री. संतोष घुमराव भेगडे (सचिव, पुणे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन; नगरसेवक, तळेगाव दाभाडे नगर परिषद विरोधी पक्षनेता; सदस्य P.M.R.D.A.)* आणि *श्री. अंकुश रामचंद्र आवेकर (संचालक, श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्या., तळेगाव दाभाडे; संचालक, पु. जि. स. बोर्ड)* यांची उपस्थिती होती.



संचालक मंडळ

श्री. समीर शंकरराव भेगडे, श्री. शंकर मारुती भेगडे, श्री. अमित अरुण भसे, श्री. राहुल पंढरीनाथ घारे, श्री. आशिष विलास खांडगे, सौ. संध्या आकाश देसाई, सौ. मेघा संदीप भेगडे, श्री. अनिल पंढरीनाथ भोमे (मुख्य कार्यकारी अधिकारी) आदी संचालक मंडळाच्या सदस्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य केले.

निमंत्रित संचालक मंडळ – शाखा कामशेत

श्री. विष्णू गायरखेडे (मा. उपसभापती कृ.उ.बा.स.), श्री. संतोष कुंभार (मा. सभापती), श्री. विलास मानकर (उपसभापती कृ.उ.बा.स.), श्री. सागर येवले (मा. उपसभापती), श्री. अरविंद ओमसावळ (उद्योजक), श्री. राजेंद्र लालगुडे (उद्योजक), श्री. बाळासाहेब काजळे (मा. उपसरपंच), श्री. सोमिनाथ शिंदे (मा. उपसरपंच), श्री. अशोक मानकर (मा. अध्यक्ष), श्री. विजय हुलावळे (उद्योजक) व श्री. साई बाळगुडे (उद्योजक) यांची उपस्थिती व सहकार्य लाभले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ओम साई मित्र मंडळ, श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्था शाखा कामशेतचे पदाधिकारी, संचालक मंडळ, कर्मचारी, कार्यकर्ते तसेच सहभागी सर्व भाविकांचे आयोजकांच्या वतीने आभार मानण्यात आले.

“श्री गणरायाच्या भक्तीतून समाजात एकोपा, बंधुभाव आणि मानवतेची भावना अधिक दृढ व्हावी,” हा संदेश या सामूहिक अथर्वशीर्ष पठण कार्यक्रमातून देण्यात आला.

सारा न्युज नेटवर्क 

मावळ प्रतिनिधी - रमेश मारूती शिंदे ७७९८९९७२३८

No comments:

Post a Comment