सारा न्यूज नेटवर्क -
आज शारदीय नवरात्र महोत्सवास प्रारंभ -
सोलापूर (प्रतिनिधी) :- श्री महालक्ष्मी समाजसेवी संस्था - व संशोधन न्यास राघवेंद्र नगर व रामनारायण चंडक विहार यांच्या वतीने सैफुल येथील श्री महालक्ष्मी मंदिरात आज 15 ऑक्टोबर 2023 रोजी रविवार पासून शारदीय नवरात्र महोत्सवास धार्मिक वातावरणात प्रारंभ झाला. हे महालक्ष्मी मंदिर जवळपास शंभर वर्षे जुने असुन, हि महालक्ष्मी नवसाला पावते अशी सर्व भाविकां मध्ये धार्मिक भावना प्रसिद्ध आहे.
श्री महालक्ष्मी मंदिरात मंदिर उत्सव अध्यक्ष भानुदास सुर्यवंशी यांच्या हस्ते विधिवत घटस्थापना करण्यात आली.
मंत्रोपच्चाराने तसेच आई राजा उदो-उदोच्या जयघोषात पारंपारिक संबळ वाद्याच्या साथीने सर्व पुजाविधी करण्यात आले.
श्री महालक्ष्मी पालखीचे पारंपारिक पध्दतीने पुजा करुन मंदिरापासून या पालखीची मिरवणूक काढण्यात आली. मंदिरातील सभामंडप सैफुल, ओम गर्जना चौक,वैष्णवी नगर, राघवेंद्र नगर, राम नारायण चंडक विहार तसेच सैफुल परिसरा मध्ये वाजत गाजत देविची पालखी मिरवणूक काढण्यात आली,
नवरात्र महोत्सवा निमित्त प्रभाग क्रमांक 26 च्या माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांच्या हस्ते देवीची पूजा करण्यात आली. यावेळी मंदिर परिसरात सुशोभीकरण,अंतर्गत रस्ते,पालखी मिरवणूक मार्गावर पडलेले खड्डे बुजवून घेऊन , पिण्याचे पाण्याची पाइपलाइन व इतर कामे पूर्ण केल्यामुळे नगरसेविका राजश्री चव्हाण यांचा मंदिर समिती तर्फे सत्कार करण्यात आला.
सदर पालखी मिरवणूक यशस्वीरीत्या पूर्ण करण्यासाठी उत्सव अध्यक्ष भानुदास सुर्यवंशी, उपाध्यक्ष संजय जाधव, सचिव हणमंत मोतीबने सर, कोषाध्यक्ष धानया स्वामी,सहसचिव दत्तात्रय लालसंगी, लेझीम पथक प्रमुख दिपाली कुलकर्णी, मृंदाताई कुलकर्णी, वृषाली सोडडे यांनी पालखी मिरवणूक सोहळा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment