Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Monday, October 2, 2023

सोलापूर केअर हॉस्पिटल व मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने विजापूर रोड येथे राष्ट्रीय स्वच्छता अभियान...

 


सारा न्यूज नेटवर्क - 

सोलापूर (प्रतिनिधी):- विजापुर रोडवरील सोलापूर केअर हॉस्पिटल व विजापुर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्यावतीने राष्ट्रीय स्वच्छता अभियान सैफुल ते केअर हॉस्पिटल परिसरात स्वच्छता करुन साजरा करण्यात आला.

या वेळी दैनिक संचार चे वरिष्ठ उपसंपादक प्रशांत जोशी म्हणाले की स्वच्छता राखणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. स्वच्छता हे आपल्या घरापासुन सुरुवात करावी असे सांगितले.

केअर हॉस्पिटल चे चेअरमन डॉ.मल्लिकार्जुन तरनळळी म्हणाले की आरोग्य व स्वच्छता हे वैद्यकीय क्षेत्राचे मुलमंत्रच आहे. केअर हॉस्पिटल हे नेहमीच राष्ट्रीय उपक्रम व अभियान राबविण्यास प्राधान्य देते असे म्हटले.


या अभियान प्रसंगी केअर हॉस्पिटल चे डॉ. विवेक कांबळे, डॉ. पूनित मठपती, अधिकारी उज्वल पाटील, अभियंता श्रेयस थळंगे अंबादास धायगुडे, मल्लिकार्जुन तलिकोटी, विशाल कटारे तसेच वीरशैव लिंगायत प्रतिष्ठान च्या महिला अध्यक्षा सुचित्रा थळंगे विजापुर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाचे संस्थापक सदस्य विजय शाबादी, उत्सव अध्यक्ष महेश देवकर, बिळेनी बिराजदार,ट्रस्ट सदस्य शाम धुरी, ट्रस्ट सचिव विश्वनाथ आमणे, सेवानिवृत्त पोलिस अधिकारी रमेश मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते.

हे अभियान सुरु असताना या परिसरातून जाणारे व येणारे नागरिक ही सहभागी होऊन स्वच्छता अभियानात सहभागी नोंदविला. या अभियानासाठी केअर हॉस्पिटलचे सर्व स्टाफ ने विशेष योगदान दिले.

सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे

No comments:

Post a Comment