सारा न्यूज नेटवर्क -
सोलापूर (प्रतिनिधी) :- राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती गुरववाडी ता.अक्कलकोट येथे उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी त्यांच्या प्रतिमांचे पूजन गुरववाडीचे सरपंच सौ. लक्ष्मी माळपा पुजारी उपसरपंच जगदेवी स्वामी यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
तसेच महात्मा गांधी जयंती यांच्या कार्यक्रमाच्या औचित्य साधून महिला बचत गटाची मीटिंग व जि.प.मराठी शाळा ग्राम शिक्षण समितीचे अध्यक्षपदाचे निवड करण्यात आले नूतन अध्यक्षपदी श्री अंबणा विठ्ठल पुजारी यांचे बहुमताने निवड करण्यात आले, व त्याचे गुरववाडीचे सरपंच लक्ष्मी माळाप्पा पुजारी उपसरपंच जगदेवी स्वामी व ग्रामपंचायत विद्यमान सदस्य व माजी सरपंच माळाप्पा पुजारी तंटामुक्त अध्यक्ष रवीकिरण स्वामी,डॉ.काशिनाथ मुतगी, ग्रामसेवक के.जी.मकानदार यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आले, याप्रसंगी बहुसंख्य नागरिक व महिला उपस्थित होते.
याप्रसंगी गुरववाडीचे सरपंच माळाप्पा पुजारी, डॉ. काशिनाथ मुतगी, महिला बचत गटाचे अध्यक्ष सौ अनिता मोती, यांचे मार्गदर्शनपण मनोगत व्यक्त करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी, प्रमुख उपस्थिती. गुरववाडीचे ग्रामपंचायत सदस्य सौ. अंबावा कोळी, सारिका वंकारी, ग्रामसेवक के.जी.मकानदार साहेब,, जि.प.मराठी शाळाचे मुख्याध्यापक श्री राजकुमार चौगुले सर. ग्राम शिक्षण समितीची उपाध्यक्ष सौ. सुखदेवी बहादुरे, अंगणवाडी सेविका अंबाबाई फुलारी, निलाबाई मुंडेवाडी, आशा वर्कर, अश्विनी फुलारी, शरणावा बबलाद, महिला बचत गटाचे अध्यक्ष सौ अनिता मोती, सुजाता स्वामी, शिलवंती स्वामी, मंगला बोरगाव, सुगलाबाई कांबळे,लक्ष्मी पुजारी, तसेच अर्जुन बहादुरे. धानप्पा विंचुरे, शिवलिंगप्पा रावजी, हिराचंद विजापूरे, रवी मोती, शिवानंद करजगी ,शिवानंद पुजारी, ग्रामपंचायत कर्मचारी श्री शिवानंद रावजी, गुरूशांत सावळी यांची उपस्थिती होती.
यावेळी बहुसंख्येने महिला व गावातील नागरिक उपस्थित होते.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment