सारा न्यूज नेटवर्क -
सोलापूर (प्रतिनिधी) :- संत गुरु रविदास विश्व महापिठाची कार्यकर्त्याची गुलबर्गा येथे बैठक संपन्न झाली. हि कार्यकर्त्याची बैठक गुलबर्गा येथे वीरशैव कल्याण मंडळ या हॉलमध्ये संपन्न झाली, बैठकीला मार्गदर्शन करताना कलबुर्गी ग्रामीणचे आमदार बसवराज मूर्तीमोड म्हणाले की चर्मकार-समगर समाजातील जाती व पोट जाती एकत्र येऊन एक मजबूत संघटना बनवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा, समाजाने शासना मध्ये निर्माण करून समस्या सोडवाव्यात असे त्यांनी म्हटले, राष्ट्रीय महामंत्री सुरेखा लांबतुरे यांनी समाजावर कोणत्याही प्रकारचे अन्याय होऊ देणार नाही समाज संघटित करून शासनाकडे समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करू व संत रविदास महाराज यांचे जयंती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे करू असे म्हटले.
याप्रसंगी गुलबर्गा जिल्हा शहर अध्यक्ष संतोष रायकोंडे नरसिंह शाबाद ग्रामीण जिल्हाध्यक्ष तसेच युवक अध्यक्ष गजानन बी दिवाकर व सचिव म्हणून किरण कुमार सूर्यवंशी महिला आघाडी म्हणून सरिता कबाडे प्रियंका कबाडे व तसेच सिद्धांत समता जीवन ग्रामीण सचिव म्हणून अशा २१ शहर व जिल्हा पदाधिकारी यांच्या निवडी जाहीर.
गुलबर्गा येथील आमदार श्री.बसवराज मतिमृड यांचा सत्कार करताना.गुरु रविदास विश्व महापीठचे राष्ट्रीय महामंत्री सुरेखाताई लामतुरे, दलित मित्र अशोकजी लामतुरे, गुरु रविदास विश्व महापीठ शहर अध्यक्ष रविकांत कांबळे, कार्यअध्यक्ष संतोष कबाड़े सचिन राऊत संतोष रायकोडे सुधाकर कबाडे इत्यादी उपस्थित होते*
तसेच गुलबर्गा येथे चर्मकार समाजाचे डॉ शिवलिंग गवळी मुख्याध्यापक पदावरून सेवा निवृत्त झाल्याबद्दल या कार्यक्रम प्रसंगी गुरु रविदास विश्व महापीठचे राष्ट्रीय महामंत्री सुरेखाताई लामतुरे, दलित मित्र अशोकजी लामतुरे, गुरु रविदास विश्व महापीठ शहर अध्यक्ष रविकांत कांबळे, कार्यअध्यक्ष संतोष कबाड़े सचिन राऊत संतोष रायकोडे सुधाकर कबाडे इत्यादी उपस्थित होते.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment