Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Sunday, October 1, 2023

जीके मागासवर्गीय बहुउद्देशीय संशोधन संस्था सोलापूर यांच्या शासन दरबारी पाठपुराव्याला यश...

 


सारा न्यूज नेटवर्क - 

सोलापूर (प्रतिनिधी) :- जीके मागासवर्गीय संस्थेच्या वतीने वेळोवेळी शासनाला निवेदन देऊन संजय गांधी श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांना अनुदान  योजनेत वाढ करण्यात यावी असे निवेदन देऊन आज शासनाच्या वतीने अनुदान योजना पाचशे रुपये वाढ करून यापुढे दरमहा पंधराशे रुपये अनुदान प्रत्येक लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले. 



जीके मागासवर्गीय संस्थेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 


त्यानंतर संस्थेचे पदाधिकारी व निराधार महिला भगिनी यांच्यासोबत एकमेकास गोड मिठाई देऊन आनंद उत्सव साजरा करण्यात आला. 


तसेच सोलापूर उत्तर तसिल कार्यालय व शहर संजय गांधी कार्यालय या दोन्ही कार्यालयाचे संस्थेच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले याप्रसंगी जी के  संस्थेचे अध्यक्ष संतोष गायकवाड महाराष्ट्र नाभिक समाज प्रदेश कार्याध्यक्ष सिद्राम रुद्राळ, पत्रकार सुरक्षा समितीचे शहर अध्यक्ष तथा सारा न्यूज नेटवर्कचे संपादक राम हुंडारे, सचिव न्यानेश्वर पवार, कार्याध्यक्ष महेश उंबरगीकर, सौदागर फाळके आणि समस्त महिला वर्ग उपस्थित होता.


सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे

No comments:

Post a Comment