Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Friday, October 6, 2023

श्री पंचाक्षरी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शासकीय रेखाकला परीक्षेला सुरुवात...

 


सारा न्यूज नेटवर्क - 

सोलापूर (प्रतिनिधी):- कला संचन्यायालयाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या शासकीय रेखाकला ग्रेड चित्रकला परीक्षा 2023 माळकवठे तालुका दक्षिण सोलापूर रेखाकला परीक्षेत तर्फे एलिमेंटरी आणि इंटरमिजीएट चित्रकला परीक्षेस प्रारंभ. 



श्री गुरु पंचाक्षरी बृह्ममठ माळकवठे संचालित प्रशालेत दिनांक 4 ऑक्टोंबर पासून शासकीय रेखाकला परीक्षेला सुरुवात झाली असून केंद्र क्रमांक 109048 या केंद्रात एकूण 473 विद्यार्थी एलिमेंटरी 209 इंटरमिजीएट ग्रेड 264 शासकीय रेखाकला परीक्षेसाठी प्रविष्ट झाले असून दिनांक 4/ 10 2023 पासून दिनांक 5/ 10/ 2023 रोजी एलिमेंटरी ग्रेड परीक्षा शासनाच्या वतीने केंद्रात घेण्यात येत आहे तसेच दिनांक 6/ 10 /2023 ते दिनांक 7 /10/ 2023 रोजी इंटरमिजीएट ग्रेड परीक्षा शासनाच्या वतीने केंद्रात घेण्यात येते येत आहे.




या विद्यार्थ्यांना कला शिक्षक सिद्धाराम काळे सर यांच्या मार्गदर्शन लाभले.या वस्तूचित्र संस्मरणचित्र,संकल्पचित्र,कर्तृत्य भुमिती व अक्षरलेखन असे विषय समाविष्ट असून केंद्राच्या केंद्र संचालक मल्लिकार्जुन माकणे सर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत पुष्प गुच्छ देऊन परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी प्राचार्य मल्लिकार्जुन माकणे,रमेश बिराजदार,कलाशिक्षक सिद्धाराम काळे,बसवराज कोरे,सिद्धाराम बगले,सिद्धाराम अंकुशे,अजित व्हनमाने,गुरुप्रसाद कुगणे,हनुमंत केदार,गुरुप्रकाश भैरगुंडे,श्रीमती मल्लम्मा उटगी,श्रीमती स्नेहल सालीमठ,श्रुती बगले,अश्विनी स्वामी,गुलाब पवार,षडाक्षरी स्वामी,शशिकांत सदाफुले,सोमशेखर म्हेत्रे,सचिन व्हनमाने,मैनोद्दीन मोमीन,कुरेशी शेख,नागेनवरु,गिरमल गुड्डेवाडी आदी शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.


सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे

No comments:

Post a Comment