सारा न्यूज नेटवर्क -
सोलापूर (प्रतिनिधी) :- राष्ट्रीय युवा कार्यकर्ता भाजपा बंजारा समाज तसेच राष्ट्रीय युवा अध्यक्ष इंटरनॅशनल गुआर बंजारा प्रगती फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल चव्हाण यांचा नुकताच सोलापूर दौरा झाला.
राहुल चव्हाण सोलापूर शहरात आले असता त्यांची सदिच्छा भेट झाली, यावेळी त्यांचा पत्रकार सुरक्षा समितीचे शहर अध्यक्ष तथा सारा न्यूज नेटवर्कचे संपादक राम हुंडारे यांच्या हस्ते शाल व पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला तसेच पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार, साप्ताहिक यश संघर्ष न्यूजचे संपादक सादिक शेख, दैनिक लोकशाही मतदारचे संपादक अक्षय बबलाद, यश संघर्षचे सह संपादक विजय चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते तुकाराम राठोड, गव्हर्न्मेंट कॉन्ट्रॅक्टर सचिन राठोड, कपिल राठोड, चांदेकर आदी सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार उपस्थित होते.
सारा न्युज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment