Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Monday, October 30, 2023

खळबळजनक ...! १२ लाख रुपयांची रोकड अन् सोन्या- चांदीच्या दागिण्यांसह १८ लाखाला घर रिकामं

 सारा न्यूज नेटवर्क - 


सोलापूर (प्रतिनिधी) : - बंद घराचे पाठीमागील बाजूस असलेल्या स्वयंपाक घराचे दार कशाने तरी तोडून अज्ञात चोरट्याने बेडरूममधील कपाटात ठेवलेली बारा लाख रुपयांची रोकड आणि सोन्या चांदीचे दागिने असा एकूण १७ लाख ८९ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. ही १८ लाख रुपयांला घर रिकामं झाल्याची खळबळजनक घटना विजापूर रस्त्यावरील मंत्री चंडक पार्कमध्ये रविवारी घडली. याप्रकरणी विजापूर नाका पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.


याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, विजापूर रस्त्यावरील मंत्री चंडक पार्कमध्ये हुसेनबाशा चाँदसाब शेख (वय-६३ वर्षे) यांचे राहते घर आहे. रविवारी सकाळी ते नई जिंदगी येथील त्यांच्या मुलाच्या घरी गेले होते. त्यांची पत्नी आणि सून हे त्यांच्या माहेरी गेले. त्यांच्या सुनेने माहेरी जाताना घराच्या मुख्य दरवाजाला कुलुप लावून गेली होती.


तेव्हा कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या पाठीमागील बाजूस स्वंयपाक घराचे दार तोडून आत प्रवेश केला. चोरट्याने बेडरूममध्ये असलेल्या लाकडी कपाटामध्ये ठेवलेली १२ लाख रूपयांची रोकड आणि सरकारी किंमतीनुसार सुमारे ७ लाख रूपयांचे दागिने चोरून नेले. घरफोडीची ही घटना रविवारी दुपार ते सायंकाळपूर्वी घडली. 


घरफोडीत चोरीस गेलेल्या ऐवजामध्ये १२,००,००० रूपयांच्या भारतीय चलनातील विविध दराच्या नोटा,

९० हजार रूपये किंमतीचे १ नग सोन्याचे अरबी पट्टा त्यास खाली पदक असलेले अंदाजे वजन ३ तोळे, ६० हजार रूपये किंमतीचे ०१ नग सोन्याचे राणी हार त्यास खाली पदक असलेले अंदाजे वजन २ तोळे, ९० हजार रूपये किंमतीच १ नग सोन्याचे नेकलेस अंदाजे वजन ३ तोळे, ३० हजार रूपये किंमतीचे १ जोड सोन्याचे कानातील टॉप्स व १ जोड सोन्याचे वेल अंदाजे वजन १ तोळे, २४ हजार रूपये किंमतीचे २ नग सोन्याचे लेडिज अंगठी प्रत्येकी वजन ४ ग्रॅम, ४५ हजार रूपये किंमतीचे ५ नग सोन्याचे लेडीज अंगठी प्रत्येकी वजन ३ ग्रॅम, ७५ हजार रूपये किंमतीचे १ नग सोन्याचे मंगळसुत्र वजन २.५ तोळे, ७५ हजार रूपये किंमतीचे १ नग सोन्याचे मंगळसूत्र वजन २.५ तोळे, ३० हजार रूपये किंमतीची १ नग सोन्याची चैन वजन १ तोळे, ३० हजार रूपये किंमतीचे १ नग सोन्याचे मंगळसूत्र वजन १ तोळे, १५ हजार रूपये किंमतीच्या १ जोड सोन्याचे कानातील रिंग वजन ५ ग्रॅम, १५ हजार रूपये १ जोड सोन्याचे कानातील रिंग वजन ५ ग्रॅम, ०७ हजार रूपये किंमतीचे एक जोड चांदीचे पैजण वजन २२ तोळे आणि ३,५०० रूपयांचे १ जोड चांदीचे पैजन वजन १० तोळे या ऐवजाचा समावेश आहे. 


याप्रकरणी हुसेनबाशा चॉदसाब शेख यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यात त्यांच्या घरातील १७ लाख ८९ हजार ५ शे रुपये किंमतीच्या ऐवज चोरीस गेला असल्याचे सांगितले. या घरफोडीने शहरात चोरट्यांचे मनोबल उंचावल्याचे दाखवून दिले आहे. पोलीस उपनिरीक्षक गायकवाड या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.


सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे

No comments:

Post a Comment