सारा न्यूज नेटवर्क -
सोलापूर (प्रतिनिधी) :- आज सोलापूर देगाव रोड येथील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय सोलापूर येथे भेट दिली असता.
तेथे कार्यरत सहाय्यक कामगार आयुक्त सुधीर गायकवाड यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी जीके मागासवर्गीय संस्थेचे अध्यक्ष संतोष गायकवाड, सारा सामाजिक संस्थाअध्यक्ष राम हुंडारे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यावेळी गुरववाडी ता.अक्कलकोट येथील सरपंच माळप्पा पुजारी, जनता संघर्ष न्यूजचे संपादक सिद्धार्थ भडकुंबे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना सहा. कामगार आयुक्त सुधीर गायकवाड म्हणाले की,
सोलापूर जिल्हा मध्ये विविध प्रकारच्या कामगार काम करत आहेत. मिल मजदूर कामगार, कारखान्यात काम करत असलेले कामगार, बांधकाम इमारत कामगार असे वेगवेगळे प्रकारचे कामगार काम करत असतात. त्यात प्रामुख्याने बांधकाम इमारत असंघटित कामगार मंडळाच्या कामगार व त्यांच्या कुटुंबीयांनासाठी विवीध प्रकारच्या शासकीय योजना आहेत, त्या योजना सर्व सामान्य गरीब कामगारा पर्यंत पोहोचवण्याच काम सामाजिक संस्थानी करावै असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त सुधीर गायकवाड यांनी सदिच्छा भेटी दरम्यान बोलताना व्यक्त केले.
त्या वेळी त्यांच्याशी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करण्यात आली आणि त्यांनी आश्वासन दिले की आमच्याकडून आपल्या संस्थेस सर्व पेपर सहकार्य व शासकीय शासकीय योजनेचा लाभ मिळवून देऊ. त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment