सारा न्यूज नेटवर्क -
बहुजन संस्कृतीचा पाया रचणारा रक्षक - रावण
24 ऑक्टोबर 2023
सोलापूर(प्रतिनिधी) : - संभाजी ब्रिगेड च्या वतीने जुळे सोलापुरातील संभाजी ब्रिगेडच्या संपर्क कार्यालयामध्ये बहुजन संस्कृतीचे नायक सम्राट रावण यांच्या प्रतिमेचे पूजन संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम यांच्या हस्ते करण्यात आले.
विजयादशमीच्या निमित्ताने दरवर्षी रावणाचे दहन केले जाते. राम-रावण यांच्यातील सांस्कृतिक संघर्ष उभा करण्यात आला. पुराण, कथा, साहित्य, कला यामधून रावणाला दुर्गुणी, अवगुणी प्रवृतीचा प्रतिक बनवलं गेल. परंतु रावणसंहिता, कुमारतंत्र, सामवेदातील ऋचा, शिवतांडवस्स्तोत्र, वीणा, बुद्धिबळ यांची निर्मिती रावणाने केली. येवढा विद्वान कित्तेक शास्त्रात पांडित्य मिळूनही खलनायक का ठरवला गेला सर्व देवांना पराभूत करणारा सर्व दैत्य, दानव, असुर आणि कित्तेक भटक्या जमातींना स्थैर्य आणि समृद्धी देऊन सोन्याची लंका बनवणारा महान राजा रावण होता होता.
“रावण” म्हणजे आसमंत भेदणारी महत्त्वाकांक्षा, प्रबळ इच्छाशक्ती, दृढ आत्मविश्वास, धैर्य, सामर्थ्य, न्याय-नितीमत्ता आदी गुणांनी संपन्न; बुद्धीच्या जोरावर स्वतःचं साम्राज्य उभं करणारा राक्षसांचा राजा रावण होता. दर्शन, व्यापार, राज्यशास्त्र, आयुर्वेद या अनेक विषयात पांडित्य मिळवूनही खलनायक ठरवलेला शिवाची भक्ती करणारा आणि आपल्या शक्तीच्या बळावर सोन्याची लंका निर्माण करणारा राजा रावण होता, अशी माहिती दिली.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शाम कदम जिल्हाध्यक्ष संभाजी राजे भोसले, कार्याध्यक्ष अरविंद शेळके उपशहर प्रमुख सिताराम बाबर, जिल्हा कार्याध्यक्ष बबन डिंगणे शहर संघटक सुलेमान पिरजादे, शहर सचिव महेश भंडारे व मल्लिकार्जुन शेवगार सिद्धार्थ बनसोडे, ओमकार कदम, किशोर कदम, शेखर कंटी कर, शुभम कांबळे सुमित कांबळे आदी उपस्थित होते.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment