Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Friday, October 27, 2023

दक्षिण सोलापूर तहसील कार्यालयाचे नुतन तहसीलदार किरण जमदाडे यांची सदिच्छा भेट व सत्कार...

सारा न्यूज नेटवर्क -

सोलापूर (प्रतिनिधी) :- दक्षिण सोलापूर तहसील कार्यालय येथे नूतन तहसीलदार म्हणुन श्री किरण जमदाडे यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे.


त्यांचा जी के मागासवर्गीय संस्थेचे अध्यक्ष संतोष गायकवाड,
 सारा सामाजिक संस्थाअध्यक्ष तथा पत्रकार सुरक्षा समितीचे शहर अध्यक्ष राम हुंडारे आणि गुरववाडी ता.अक्कलकोट येथील सरपंच माळप्पा पुजारी यांनी सदिच्छा भेट घेतली.

यावेळी त्यांचा सोबत विविध प्रकारच्या विषयावर चर्चा करण्यात आली. संजय गांधी निराधार योजना तसेच सर्व प्रकारच्या शासकीय योजना संदर्भात सर्व सामान्य माणसाला त्याचा फायदा कसा होईल याचा विचार करून योजना राबविण्यात यावी अशी विनंती करण्यात आली.

यावेळी त्यांचा पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला व पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.

याप्रसंगी गुरववाडीचे सरपंच माळप्पा पुजारी, जीके संस्थेचे अध्यक्ष संतोष गायकवाड, सारा संस्था अध्यक्ष राम हुंडारे, जनता संघर्ष न्यूजचे संपादक सिद्धार्थ भडकुंबे आदी उपस्थित होते. 


सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे

No comments:

Post a Comment