सारा न्यूज नेटवर्क -
पोलिस मित्र असोसिएशनच्या वतीने "निराधारांची दिवाळी गोड" हा उपक्रम राबवत दिवाळी फराळाचे वाटप..
कोल्हापूर/इचलकरंजी (प्रतिनिधी) : - सगळीकडे सर्व सामान्य माणसापासून ते श्रीमंतातील श्रीमंत लोक दसरा,दिवाळीचा सण हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.गाड्या, दागिने,कपडे,चप्पल तसेच गोडधोड पदार्थ खरेदीला मोल नसते.या सणामध्ये प्रत्येक कुटुंबाला एकत्र येण्याची संधी मिळत असते आणि कौटुंबिक वातावरण आनंददायी, हर्षोल्हासित होऊन जाते.पण याच्या उलट पाहिले तर ज्यांना कोणाचाही आधार नाही ज्यांना कुटुंब नाही. ज्यांच्या एक वेळच्या जेवणाची वानवा होते.अंगावर नीट अंग झाकण्यासाठी कपडे मिळत नाही की पायात घालण्यासाठी सरळ चप्पल मिळत नाही. डोक्यावर तर आभाळच छप्पर म्हणावे लागेल.रस्त्याने ये जा करणार्या लोकांकडे अपेक्षेने पाहणार्या अशाच निराधार लोकांच्या चेहर्यावर आनंदाचा क्षण पाहण्यासाठी मिळावा यासाठी संस्थापक अध्यक्ष डॉ युवराज मोरे व महिला राज्याध्यक्ष डॉ रजनीताई शिंदे यांच्या संकल्पनेतून पोलिस मित्र असोसिएशनच्या वतीने "निराधारांची दिवाळी गोड" हा उपक्रम राबविण्यात आला.इचलकरंजी शहर तसेच कोल्हापुरातील CBS स्टँड जवळील राजीव गांधी पुतळ्याजवळ,महालक्ष्मी मंदिर, दत्त भिक्षालिंग मंदिर येथील निराधार असलेल्यांना दिवाळीचा फराळ वाटप करत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी पोलिस मित्र असोसिएशनचे उपाध्यक्ष नियाज जमादार,राज्य संपर्कप्रमुख मुरलीधर शिंदे, इचलकरंजी शहर महिला अध्यक्ष आशा वाघिरे,सचिव संगीता रुग्गे,उपाध्यक्ष सरस्वती हजारे, नंदा जगदाळे,मनीषा आवळे चंद्रकला शिंदे आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते तसेच या उपक्रमासाठी संस्थापक अध्यक्ष डॉ युवराज मोरे, महिला राज्याध्यक्ष डॉ रजनीताई शिंदे, उपाध्यक्ष नियाज जमादार, मराठवाडा विभाग प्रमुख डॉ भारत भाग्यवंत, मुरलीधर शिंदे, रुपाली ठोमके, सरस्वती हजारे, विमल मोरे यांचे आर्थिक सहकार्य लाभले.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment