Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Tuesday, November 19, 2024

लाच स्वीकारले प्रकरणी भुमी अभिलेख खात्यातील परिरक्षक भूमापक कर्मचाऱ्यांसह एकाची निर्दोष मुक्तता

 


सारा न्यूज नेटवर्क - 

लाच स्वीकारले प्रकरणी भुमी अभिलेख खात्यातील परिरक्षक भूमापक कर्मचाऱ्यांसह एकाची निर्दोष मुक्तता...

सोलापूर (प्रतिनिधी) :- लाच स्वीकारले प्रकरणी आरोपी नामे अब्दुल गफार कुरेशी रा.सोलापूर तसेच खाजगी इसम सुधीर लोंढे रा. सोलापूर यांची लाच स्वीकारले प्रकरणी विशेष न्यायदंडाधिकारी श्री वी के मांडे यांनी निर्दोष मुक्तता केली.

यात दि ०२/०३/२०२० रोजी तपास अधिकारी जगदीश भोपळे यांनी बार्शी पोलीस स्टेशन मध्ये सदर दोंघांविरुद्ध फिर्याद दिली व गुन्हा दाखल केला. सदर कामी पोलिसांनी तपास करून दोषारोपपत्र मा. न्यायालयात दाखल केले. 

सदर खटल्याच्या सुनावणीवेळी सरकार पक्षातर्फे साक्षीदार तपासण्यात आले.आरोपीतर्फे अनेक महत्वाचे मुद्दे मांडण्यात आले. 

 सदर बाबींचा विचार करून बार्शी येथील विशेष न्यायाधीश मा श्री वी के मांडे यांनी सदर आरोपींची निर्दोष मुक्तता केली .

यात आरोपीतर्फे अँड. सुरेश पाटील कुरूलकर, अँड. विजय सुर्वे, अँड.ओंकार बिराजदार यांनी काम पाहिले तर सरकार पक्षातर्फे सरकारी वकील अँड बोचरे यांनी काम पाहिले. 

सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment