सारा न्यूज नेटवर्क -
जिल्हा क्रीडा संकुल येथे झालेल्या विविध क्रिडा स्पर्धेत मॉडर्न प्रशालेच्या विद्यार्थ्यांनंच यश संपादन..
सोलापूर (प्रतिनिधी) :- सोलापूर जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धामध्ये मॉडर्न प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
दिनांक 23 10 2024 रोजी जिल्हा क्रीडा संकुल येथे तायक्वांदो शालेय क्रीडा स्पर्धा झाल्या यामध्ये इयत्ता नववी मधील कुमारी श्रिया श्रीनिवास कोलप्याक हिचा प्रथम क्रमांक आला असून गोल्ड मेडल मिळाले आहे.
दिनांक 24 10 2024 रोजी जिल्हा क्रीडा संकुल येथे कराटे शालेय क्रीडा स्पर्धा झाल्या यामध्ये इयत्ता नववी मधील चिरंजीव श्रेयस गणेश कविटकर यांचा प्रथम क्रमांक आला असून त्यास गोल्ड मेडल मिळाले. इयत्ता दहावी मधील चिरंजीव समर्थ पवार यास शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये कराटे यामध्ये तृतीय क्रमांक मिळाला आहे. कुमारी रिया तांबोळी इयत्ता नववी मधील विद्यार्थिनीची बॉक्सिंग या खेळासाठी विभागीय स्तरावर निवड झाली आहे चिरंजीव अर्णव वैभव राऊत याचे शालेय जिल्हा स्पर्धेत पिप साईडरायफल शूटिंग यामध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे त्यास गोड मेडल मिळाले असून त्याची विभागीय स्तरावर निवड झाली आहे नॅशनल असोसिएशन वेस्ट झोन पुणे स्पर्धेत फ्री नॅशनल क्वालिफाय झाला आहे.
वरील सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक प्रशालेचे सचिव श्री के के कुलकर्णी सर यांनी केले तसेच मुख्याध्यापिका शिल्पा जोशी मॅडम पर्यवेक्षिका रागिणी म्हैसकर मॅडम तसेच सर्व शिक्षकांनी अभिनंदन करू पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यासाठी श्री अविनाश गोसावी सरांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment