Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Thursday, November 14, 2024

जीके मागासवर्गीय संस्थाचे वंचित निराधारांसोबत फराळ वाटुन दिवाळी साजरी..

 


सारा न्यूज नेटवर्क - 

जीके मागासवर्गीय संस्थाचे वंचित निराधारांसोबत फराळ वाटुन दिवाळी साजरी.. 

सोलापूर (प्रतिनिधी) :- सालाबाद प्रमाणे याही वर्षी दीपावली सणा निमित्त जीके मागासवर्गीय बहुउद्देशीय संशोधन संस्था सोलापूर यांच्याकडून कुमठा नाका कुष्ठरोग वसाहत या ठिकाणी 101 फराळकिट वाटप करण्यात आले. 



संस्थेचे हे 8 वे वर्ष आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ईको नेचर क्लबचे अध्यक्ष पर्यावरण दूत डॉ.मनोज देवकर होते. यावेळी सारा न्यूजचे संपादक राम हुंडारे, जीके मागासवर्गीय संस्थेचे अध्यक्ष संतोष दादा गायकवाड यांनी या फराळ वाटप कार्यक्रमास उपस्थित राहुन वंचित निराधार महिला व मुलांसोबत दिवाळी साजरी केली.


संस्थेचे अध्यक्ष संतोष गायकवाड यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली या कार्यक्रमास परिसरातील महिला माता भगिनी बाळगोपाल तसेच ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून दिवाळीसण फराळ आस्वाद घेतला.  या कार्यक्रमास सुजाता लामकाने, जयश्री कांबळे, राजश्री बिरादार, संगीता पाठक, सुमन कांबळे, नंदा पवार, मनीषा सुतार, विद्या सगर, महानंदा पाटील, शहनाज नदाफ, रूपाली शिंदे, श्रीदेवी पांढरे, शुभम सुरवसे, दीपक पाटील, तसेच कार्यक्रमास जी के संस्थेचे सचिव सुरज आखाडे, कार्याध्यक्ष विष्णू कांबळे, जीके संस्थेचे सदस्य मानव सोनवणे, तुकाराम पाटील, वैभव कोळी, रुपेश कदम, संजय खोणे आधी संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment