Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Wednesday, November 6, 2024

"वादग्रस्त क्राईम न्यूज" चॅनेलचा चौथा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न..

 


सारा न्यूज नेटवर्क - 

"वादग्रस्त क्राईम न्यूज" चॅनेलचा चौथा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न.. 

सोलापूर( प्रतिनिधी) :- दिनांक २ नोव्हेंबर रोजी प्रगती लॉन सोलापूर येथे "वादग्रस्त क्राईम न्यूज" चॅनेलच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा व खेळाडूंचा गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.



कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती विमल दिलीप जाधव, प्रसिद्ध उद्योगपती महेश धनवाणी, दादाई बहुउद्देशीय संस्थेचे सर्वेसर्वा युवराज जाधव, लोक अभिरक्षक जिल्हा विधीसेवा प्राधिकरण अँड देवयानी किणगी, विश्व परिवर्तन फाउंडेशनच्या राष्ट्रीय महिला सक्षमीकरणचे अध्यक्षा नसीमा शेतसंधी, अँड विश्वास जाधव, पत्रकार सुरक्षा समितीचे शहर अध्यक्ष तथा सारा न्यूजचे संपादक राम हुंडारे, उद्योगपती आकाश जाधव, निखिल जाधव यांची उपस्थिती होती. 


या कार्यक्रम प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष किसनभाऊ जाधव यांनी भेट देऊन चॅनेलला शुभेच्छा दिल्या. त्यांचा सत्कार चॅनेलच्या वतीने करण्यात आला. तसेच इकोनेचर क्लब कडून रोप देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. 



सन्मानित केलेले गुणिजन पुढीलप्रमाणे - 

🔹शालिनी चंदनशिवे - उत्कृष्ठ खेळाडू

🔹रिया जाधव - उत्कृष्ठ खेळाडू

🔹प्रणिती सांगलीकर - उत्कृष्ट खेळाडू

🔹ऐश्वर्या खंडागळे - उत्कृष्ठ खेळाडू

🔹आरोही पाटील - उत्कृष्ट खेळाडू

🔹स्मृति सोनटक्के - उत्कृष्ट खेळाडू

🔹अनुष्का जगताप - उत्कृष्ट  खेळाडू

🔹लक्ष्मण चंदनशिवे - स्व-संरक्षण (प्रशिक्षक)

🔹मा.श्री. आसिफ शेख - प्रशिक्षक (कराटे)

🔹औदुंबर गेजगे - सर्पमित्र

🔹अश्फाक शेख सर - संस्थापक अध्यक्ष विना परिवर्तन फाउंडेशन

🔹मा.श्री. शंकर चौगुले - शैक्षणिक कार्य

🔹मा.श्री. लक्ष्मण (मामा) जाधव - सामाजिक कार्य (इंच्छा भगवंताची)

🔹मा.श्री. रेवणसिद्ध आर. हॉसनूर - यशस्वी उद्योजक

🔹मा.श्री. महेश धनवानी - यशस्वी उद्योजक

🔹मा.श्री. शिवराज (दाद) गायकवाड - सामाजिक कार्य

🔹मा.श्री. विक्रम (बापू) खेलबुडे - आदर्श पत्रकारिता

🔹मा.श्री. पद्माकर कावळे - आदर्श पत्रकारिता

🔹मा.श्री. शकील नदाफ - तांत्रिक विभाग प्रमुख (एडिटर)

🔹मा.श्री. सिद्धार्थ भडकुंबे - युवा पत्रकार




🔹मा.श्री. डॉ. मनोज देवकर - पर्यावरण दूत

🔹उमा देगीनाल - पर्यावरण प्रेमी

🔹देवयानी किणगी - लोक अभिरक्षक जिल्हा विधीसेवा प्राधिकरण

🔹रेशमा रसूल तलफदार - परिचारिका

आदी सत्कारमूर्तीचा सत्कार करून गौरविण्यात आले 

यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांसह खेळाडू, पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चॅनेलचे संचालक गणेश जाधव, संपादक रवींद्र जाधव, उपसंपादक अजय खंडागळे,वृत्तसंपादक निखिल होसनूर, उद्योगपती महेश धनवानी आदींनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पल्लवी माने यांनी केले तर आभार प्रदर्शन वादग्रस्त क्राईम न्यूज चॅनेलचे मुख्य संपादक RD जाधव यांनी केले.

सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment