Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Monday, November 18, 2024

राष्ट्ररत्न सोशल फाउंडेशनचे सदस्य बनले अनाथांचे नाथ..


 सारा न्यूज नेटवर्क - 

राष्ट्ररत्न सोशल फाउंडेशनचे सदस्य बनले अनाथांचे नाथ.. 

सोलापूर (प्रतिनिधी) :- 14 नोव्हेंबर बालदिनाचे औचित्य साधून राष्ट्ररत्न सोशल फाउंडेशन तर्फे अनाथ मुलांसाठी धान्य वाटप , जीवन उपयोगी वस्तू तसेच शालोपयोगी वस्तू याचे वाटप करण्यात आले..

देव त्यालाच मदत करतो जो लोकांची मदत करण्यास तयार असतो, या वाक्याप्रमाणे या ठिकाणी चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण करण्यासाठी राष्ट्ररत्न सोशल फाउंडेशन ची टीम या ठिकाणी गेली... सर्वांना फुगे फुगवून खेळायला दिल्यानंतर प्रत्येक चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरच हास्य टिपण्यासारखं होतं... अवघ्या दोनच दिवसात नियोजन ठरवल्यानंतर अनेक मदतीचे हात पुढे आले...

 संस्थेच्या अध्यक्षा सौ प्रांजली मोहीकर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरचे निरागस भाव बघितल्यानंतर चाचा नेहरूंना लहान मुलं का आवडायची याचे उत्तर इथच मिळतं... या मुलांचे आई-वडील नातेवाईक सर्व काही बनलेले सर हे एकटे मुलांची जबाबदारी घेऊन करत असलेल्या कार्याबद्दल त्यांचे कौतुक केले... संस्थेतर्फे त्यांचा सन्मान करण्यात आला... या चिमुकल्यांच्या भविष्याकरिता शुभेच्छा देऊन त्यांच्या भावी आयुष्यासाठी राष्ट्ररत्न सोशल फाउंडेशन नेहमी तत्पर असेल असेही अध्यक्षा त्यांच्या मनोगतात म्हणाल्या..

या उपक्रमासाठी, मन मोठं करून ज्यांनी ज्यांनी मदतीचा हात दिला ते म्हणजे, अध्यक्ष सौ. प्रांजली मोहीकर, उपाध्यक्ष प्रा प्रेमचंद मेने, सौ ज्योती मेने (विश्वस्त), श्री शैलेश मोहीकर, चि. वेदांत मोहीकर (विश्वस्त), 

तसेच एकत्व सोशल फाउंडेशन चे अध्यक्ष दीपक करकी, सारा न्यूजचे संपादक राम हुंडारे, पर्यावरण दुत डॉ मनोज देवकर, शाहबाज मकानदार, चेतन झाडे, ऋषिकेश हलसुरे, हेमलता नारायणकर, प्रमोद तम्मनवार, सौ अपर्णा पाठक, चि.आशीर्वाद पाठक, सौ सुवर्णा कांबळे, श्रीमती मंजिरी सवळे,मनोहर नारायणकर, रवी खानचंदानी, डॉ. श्री व सौ भोजने मॅडम, श्रीमती अनुराधा निकम, श्री सुहास भोसले, राजेश्वर पाटील, तुषार शिंदे या सर्वांनी मदतीचा हात पुढे करून उत्तम सामाजिक कार्य केले... 

याप्रसंगी इकोनेचर क्लब तर्फे मुलांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले..

धान्यवाटप करून सर्वांना खाऊ देण्यात आला.. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सुहास भोसले यांनी केले... आणि कार्यक्रमाचे आभार सौ.अपर्णा पाठक यांनी मांडले...

सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment