सारा न्यूज नेटवर्क -
सारा न्यूजच्या सहसंपादक पदी पर्यावरण प्रेमी डॉ मनोज देवकर यांची निवड व सत्कार..
समाजातील वंचित पिढीत घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी पत्रकारिता करणार - डॉ मनोज देवकर
सोलापूर (प्रतिनिधी ):- सोलापूर शहर जिल्हासह महाराष्ट्र राज्यातील सामाजिक शैक्षणिक राजकीय बातम्यांचा वेगवान आढावा घेऊन आपल्या बातमीच्या माध्यमातून आगळावेगळा वाचक वर्ग निर्माण करणाऱ्या त्याचबरोबर समाजातील तळागाळातील वंचित घटकाला प्रशासन दरबारात न्याय मिळवून देण्यासाठी नेहमीच प्रयत्न करणाऱ्या सारा न्यूज नेटवर्कच्या सहसंपादक पदी वृक्षप्रेमी तथा पर्यावरण दुत डॉ मनोज देवकर यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचा पत्रकार सुरक्षा समितीचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रामचंद्र सरवदे यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ व ओळखपत्र देऊन सोलापूर येथे सत्कार करण्यात आला.
डॉ मनोज देवकर हे इको नेचर निसर्ग संवर्धन सहकारी संस्थाचे संस्थापक अध्यक्ष आहेत. राज्य समन्वयक - पोलीस बॉईज असोसिएशन, डॉ विकास बाबा आमटे सोमनाथ प्रकल्प आनंदवन प्रकल्प येथे सेवा बजावली असून माझी वसुंधरा अभियान महाराष्ट्र शासन पर्यावरण दूत सामाजिक अध्यात्मिक पर्यावरण संवर्धन आरोग्य शैक्षणिक महिला व बालकल्याण अशा विविध क्षेत्रात त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला असून पर्यावरण वृक्ष संवर्धन या विषयावर त्यांचा गाढा अभ्यास असून ते महाराष्ट्राला पर्यावरण प्रेमी म्हणून प्रसिद्ध आहेत.
▪️समाजातील वंचित पिढीत घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी पत्रकारिता करणार असल्याचे डॉ मनोज देवकर यांनी सत्कार वेळी सांगितले.
यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे सोलापूर शहराध्यक्ष तथा सारा न्यूज चे संपादक राम हुंडारे पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार जिल्हा कार्याध्यक्ष सादिक शेख जिल्हा संघटक अन्सर तांबोळी (बी एस ) दैनिक लोकशाही मतदार चे संपादक अक्षय बबलाद राजेंद्र पवार वैजिनाथ बिराजदार इम्तियाज अक्कलकोटकर अशोक ढोणे अकबर शेख रिजवान शेख वसीम राजा बागवान अतुल भडांगे अशोक खेडगीकर इत्यादी पत्रकार बांधव उपस्थित होते.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment