Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Tuesday, November 12, 2024

5 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर या कालावधीमध्ये महाराष्ट्रभर "पक्षी सप्ताह 2024" मोठ्या उत्साहाने साजरा...



सारा न्यूज नेटवर्क - 

 "पक्षी सप्ताह 2024" 

5 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर या कालावधीमध्ये महाराष्ट्रभर "पक्षी सप्ताह 2024" मोठ्या उत्साहाने साजरा... 

सोलापूर (प्रतिनिधी) :- 5 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर या कालावधीमध्ये महाराष्ट्रभर पक्षी सप्ताह मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. 

या महोत्सवाचा भाग म्हणून सोलापूर मधील पक्षीप्रेमी आणि पर्यावरणीय संस्था देखील मोठ्या उत्साहाने विविध उपक्रम राबवतात. 

जी आय बी फाउंडेशन, आपल्या संस्थेच्या माध्यमातून 2020 सालापासून या महोत्सवी पक्षी सप्ताहामध्ये सोलापूर शहरातील विविध भागांमध्ये रोज वेगवेगळ्या ठिकाणी प्रभात फेरीसाठी येणाऱ्या नागरिकांकरिता पक्षांच्या छायाचित्रांचे फिरते प्रदर्शन भरवत आहे. 

यावर्षी जीआयबी फाउंडेशनने आपल्या उपक्रमात सातत्य ठेवत पक्षांच्या छायाचित्रांचे फिरते प्रदर्शन सात दिवस शहरातील विविध भागात प्रदर्शित केले. या प्रदर्शनास आठ हजार पेक्षा जास्त नागरिकांनी भेट देऊन या प्रदर्शनाचा आस्वाद घेतला. या प्रदर्शनाद्वारे सोलापूर शहरातील नागरिकांमध्ये पक्ष्यांविषयी उत्सुकता वाढवून त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या नैसर्गिक संरक्षण संवर्धन विषयक संविधानीक कर्तव्य भावना रुजवण्याचा हा छोटासा प्रयत्न करीत आहोत. 

या कार्यक्रमाची आणि सप्ताहाची सांगता सोलापूर महानगरपालिकेच्या इंद्र भुवन इमारतीच्या लॉन मध्ये करण्यात आली. 

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जी आय बी फाउंडेशन चे अध्यक्ष श्री पंकज चिंदरकर, सचिव श्री राजकुमार कोळी , श्री बाळासाहेब लामतुरे, श्री सारंग म्हमाणे, श्री शिवकुमार मोरे, श्री शंतन कुलकर्णी, श्री आदित्य क्षीरसागर यांनी नियोजन केले.

अरण्य ऋषी श्री मारुती चित्तमपल्ली यांच्या जन्मदिनी त्यांना लाख लाख शुभेच्छा आणि पद्मभूषण डॉक्टर सलीम अली यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment