सारा न्यूज नेटवर्क -
जुळे सोलापुरात बँकेचे एमटीएम फोडण्याचा प्रयत्न..
सोलापूर(प्रतिनिधी) :- जुळे सोलापुरातील दावत चौकातील सेंट्रल बँकेचे एटीएम अज्ञातांकडून तोंडाला काळे कापड बांधून कटावणीसारख्या वस्तूने फोडण्याचा प्रयत्न झाला. हा प्रकार बुधवारी मध्यरात्री सव्वाच्या सुमारास घडला.
याबाबत अमित रमेश गोडभरले (वय ३८, रा. अनुथम अपार्टमेंट, विजापूर रोड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन विजापूर नाका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दावत चौकात सेंट्रल बँकेचे एटीएम सेंटर आहे. बुधवारी रात्री एकनंतर तोंडाला काळे कापड बांधून व हातात कटावणीसारखी वस्तू घेऊन चोरट्याने एटीएम सेंटरमध्ये प्रवेश केला. त्याने एटीएम मशीनचे कॅश लोडिंगचे बाहेरील डोअर ओढून काढले. त्यानंतर रोख रक्कम असलेले आतील डोअर कटावणीच्या साहाय्याने उघडण्याचा प्रयत्न केला, डोअर ओपन न झाल्याने चोरीचा प्रयत्न फसला. अज्ञात चोरट्याने मशीनचे स्क्रीन पॅनल व मेंटेनन्स रुमचे दार तोडून नुकसान केले आहे.
या घटनेने एटीएम सेंटरच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार भांगे हे करीत आहेत.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment