सारा न्यूज नेटवर्क -
पत्रकार सुरक्षा समितीची सोलापुरात बैठक आंदोलने तीव्र करण्याचा निर्धार..
सोलापूर (प्रतिनिधी ) :- पत्रकार सुरक्षा समितीची सोलापूर येथे बैठक घेण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रामचंद्र सरवदे होते. या बैठकीत ज्येष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना प्रभावी पत्रकार संरक्षण कायदा राज्यातील यादीवर नसलेल्या साप्ताहिक वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे जाहिराती राज्यातील युट्युब व पोर्टलला शासकीय मान्यता राज्यातील पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी राज्यातील पत्रकारांसाठी आरोग्य योजना विमा योजना घरकुल योजना राज्यातील पत्रकारांना टोल मधून सूट मिळावी खंडणे सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पत्रकारांची स्वतंत्र अधिकाऱ्यामार्फत चौकशी राज्यातील साप्ताहिक वृत्तपत्राच्या जेष्ठ व वयोवृद्ध संपादकांना दर महा वीस हजार रुपये पेन्शन इत्यादी विषयासह राज्यातील पत्रकारांच्या विविध विषयावर चर्चा होऊन राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी तीव्र आंदोलने करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार, सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष सादिक शेख, जिल्हा संघटक आन्सर तांबोळी (बी एस ), शहर अध्यक्ष राम हुंडारे, दैनिक लोकशाही मतदार चे संपादक अक्षय बबलाद, उपेक्षितांचे व्यासपीठ वृत्तपत्राचे संपादक वैजिनाथ बिराजदार, सारा न्यूजचे सहसंपादक डॉ. मनोज देवकर लोकशाही 24 न्यूज चे संपादक वसीमराजा बागवान साप्ताहिक फुले वादचे संपादक अशोक ढोणे साप्ताहिक अंतिम न्याय चे कार्यकारी संपादक अकबर शेख अशोक खेडगीकर अतुल भडंगे ज्येष्ठ पत्रकार इम्तियाज अक्कलकोटकर साप्ताहिक कार्यसम्राटचे राजेंद्र पवार रिजवान शेख इत्यादी पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment