Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Monday, November 4, 2024

हबीबा अनाथ आश्रमातील मुलांसोबत वाढदिवस साजरा..



सारा न्यूज नेटवर्क - 

 हबीबा अनाथ आश्रमातील मुलांसोबत वाढदिवस साजरा.. 

 रेवणसिद्ध कोळी यांचा सामाजिक उपक्रम;

सदर उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे केले आवाहन.. 

सोलापूर (प्रतिनिधी) :- रेवणसद्ध कोळी हे नेहमीच सामाजिक कार्य करत असतात. ते समाजातील विविध सामाजिक उपक्रमामध्ये सहभागी होतात. ते दरवर्षी त्यांचा स्वतःचा वाढदिवस व त्यांच्या मुलांचा वाढदिवस अनाथ मुलांसोबत साजरा करत असतात. 

यावेळी त्यांच्या दोन्ही मुलांचा वाढदिवस हबीबा अनाथआश्रमातील मुलांसोबत साजरा करण्याचा योग आला. तेथील सुमारे ५० मुलांना पोटभरुन सुग्रास/मिष्ठान्न भोजन दिल्याचे मनस्वी आनंद झाला असल्याचे त्यांनी सांगितले. सदर मुलांच्या चेहऱ्यावरील समाधान पाहून मन प्रसन्न झाले. हा वाढदिवस दिपाली मल्टीपर्पज हॉल, दावत चौक, जुळे सोलापूर या ठिकाणी साजरा झाला.



“ओम” व “समर्थ” यांचा वाढदिवस दरवेळेस वेगळया पध्दतीने साजरा करतच असतो. या वर्षी दिपावलीच्या निमित्ताने अनाथ मुलांना चांगल्या प्रकारचे भोजन खाऊ घालून वाढदिवस साजरा करण्यात आला आहे. 

यावेळी श्री.रेवणसिद्ध कोळी, सौ.मेघा कोळी, संपूर्ण कोळी परिवार उपस्थित होते. मित्रमंडळी,आप्तेष्ट व पाहुणेमंडळीनी भरभरुन शुभेच्छा दिल्या. अश्या आगळयावेगळया उपक्रमाची सर्वांनी भरभरुन दाद दिली. त्यांनी सदर उपक्रमांमध्ये येत्या काळात मदतीचा हात देण्याचे अनेकांनी कबूल केले.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment