Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Tuesday, November 19, 2024

कारच्या धडकेने भारद्वाज पक्षीचे मृत्यू; पर्यावरण प्रेमींनी केले दफन

 


सारा न्यूज नेटवर्क - 

कारच्या धडकेने भारद्वाज पक्षीचे मृत्यू;

पर्यावरण प्रेमींनी केले दफन.. 

सोलापूर (प्रतिनिधी) :-  सोलापूर  बार्शी रोड महामार्गावरील गुळवंची गाव येथे एका कारच्या वेगाने भारद्वाज पक्षीचे जोरात धडक बसल्याने मृत्यू झाले. अज्ञात वाहने धडक दिल्यामुळे रक्तस्त्रात होऊन मरण पावले. 

दीपक करकी यांनी त्या पक्षाला थोडंसं पाणी पाजले प्रयत्न करत होते. पण त्या पक्षांनी जोरात धडक असल्या कारणामुळे तो पक्षी पाणी प्यायचा प्रयत्न करत होता पिल जात नव्हतं दोन मिनिटात त्याचा मृत्यू झाला. 

एकत्व सोशल फाउंडेशन सदस्य चेतन झाडे यांनी भारद्वाज पक्षीचे ज्या ठिकाणी मृत्यू झाला. त्या ठिकाणी येऊन शेजारी रस्त्याच्या कडेला त्याला दफन करून श्रद्धांजली वाहण्यात आली. 


        "एकत्व सोशल फाउंडेशनचे आवाहन" 

🔳 महामार्गावरील वाहनधारकांनी वेगाने वाहन चालविताना पाळीव प्राणी, मुक्या प्राण्यांची काळजी घ्यावी, वाहने सावकाश चालवावी असे आवाहन एकत्व सोशल सदस्यांनी केले आहे. 

सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment