Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Saturday, November 16, 2024

मातंग समाज संघ महाराष्ट्र राज्य,सोलापूर वतीने क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या २३०व्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना प्रबोधन, मार्गदर्शन व वह्या वाटप...

 


सारा न्यूज नेटवर्क - 

मातंग समाज संघ महाराष्ट्र राज्य,सोलापूर वतीने क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या २३०व्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना प्रबोधन, मार्गदर्शन व वह्या वाटप...

सोलापूर (प्रतिनिधी) :- सोलापूरात मातंग समाज संघ महाराष्ट्र राज्य सोलापूर शहरच्या वतीने क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या २३०व्या जयंतीनिमित्त प्रबोधन, मार्गदर्शन व विद्यार्थ्यांना वह्या वाटप कार्यक्रमाचे आयोजन गीता मंदिर सभामंडप , लोकसेवा हायस्कूलजवळ येथे करण्यात आले होते.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मातंग समाज संघ महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्षा व निवृत्त पोलिस अधिकारी श्रीमती मिनाक्षी पेठे,शहर उपाध्यक्ष शशिकांत उकरंडे जिल्हा कार्याध्यक्ष आदर्श धडे हे होते.


कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या प्रतिमेस प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून  करण्यात आली.कार्यक्रमास उपस्थित सर्व प्रमुख पाहुण्यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार करण्यात आले.उपस्थित विद्यार्थी,विद्यार्थ्यींनींना क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांची जिवनगाथा सहजसोप्या,ओघवत्या भाषेत सरचिटणीस प्रा किशोर जाधव यांनी उपस्थीतांना मार्गदर्शन केले क्रांतीवीर लहुजी वस्ताद यांनी आजन्म अविवाहित राहून स्वातंत्र्य लढ्यासाठी प्रशिक्षण देवून लढवय्या फौजा तयार केल्या. लोकमान्य टिळक, आगरकर, फडके यासारख्या मातब्बर विभुतींना कुस्तीचे धडे दिले दांडपट्टा, तलवार, बंदुक चालविणे शिकविले. १८५७ च्या  युध्दात निष्णात योध्द्यांच्या फौजा तयारीने उतरविल्या.खऱ्या अर्थाने जातीयतेच्या भींती ओलांडून वस्ताद लहुजीबाबा आद्यगुरू ठरले अशी ऐतिहासिक माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.


कार्यक्रमाच्या सरतेशेवटी उपस्थित सर्व विद्यार्थी विद्यार्थ्यींनींना जिल्हा समन्वयक गिरीधर थोरात व पदाधिकाऱ्यांचे हस्ते वह्या वाटप करण्यात आले.सोबत अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती.

कार्यक्रमाचे आयोजन मातंग समाज संघ महाराष्ट्र राज्य सोलापूर शहरचे जिल्हा कार्यवाहक श्रीकांत बोराडे,जिल्हा समन्वयक गिरीधर थोरात ,जिल्हा अध्यक्षा श्रीमती करूणा झुंजारे ,जिल्हा सरचिटणीस किशोर जाधव ,जिल्हा उपाध्यक्षा सौ सोनम झुंजारे शिक्षक वर्ग तसेच विद्यार्थी विद्यार्थ्यींनीसह परिसरातील मातंग समाज बांधव मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.

कार्यक्रमाचे सूत्र संचलन महाराष्ट्र उपाध्यक्षा मिनाक्षी पेठे यांनी केले तर आभार प्रदर्शन आदर्श धडे यांनी मानले.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment