सारा न्यूज नेटवर्क -
काय उघडायचं ते उघडा, नंतर तुम्हाला उघडतो.!
अधिकार्यांनी बॅगा तपासल्याने उद्धव ठाकरे संतापले;
यवतमाळ वणी (प्रतिनिधी) :- दारव्हा येथे हेलिकॉप्टरमधून उतरताच उद्धवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची बॅग निवडणूक विभागाच्या पथकाने तपासली. त्यांचे स्वीय साहायक मिलिंद नार्वेकर यांचीही बॅग तपासली. त्यानंतर वणीमध्येही हाच प्रकार घडला.
त्यावेळी ठाकरे संतापले. माझ्या आधी तुम्ही अन्य कोणाची बॅग तपासली का, असा सवाल त्यांनी कर्मचाऱ्यांना केला. तसेच माझी बॅग तपासा, परंतु मोदी-शाह, शिंदे, अजित पवार, फडणवीस यांचीही बॅग तपासण्याचे धाडस दाखवा, तिकडे शेपूट घालू नका, अशा शब्दात त्यांनी संताप व्यक्त केला.
उद्धव ठाकरे यांनी सोमवारी दारव्हा आणि वणी येथे सभा घेतली. दोन्ही सभेत ते म्हणाले, मी प्रचारासाठी वणीत पोहोचल्यानंतर हेलीपॅडवर सात ते आठ अधिकाऱ्यांनी माझी बॅग तपासली. मी त्यांना परवानगी दिली. मी त्यांचा व्हिडीओ काढला. पण, यापुढे कुणाची बॅग तपासण्यात आली, तर प्रथम त्या अधिकाऱ्याचे ओळखपत्र तपासा, तो कुठल्या हुद्द्यावर आहे हे जाणून घ्या. जसे ते तुमचे खिसे तपासत आहेत, तसेच त्यांचेही खिसे तपासा. हा आपला अधिकार आहे.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment