Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Friday, November 15, 2024

एक हात मदतीचा बालदिना निमित्त समाजातील दुर्लक्षित अनाथ मुलांना अन्नदान वाटप;


 सारा न्यूज नेटवर्क - 

एक हात मदतीचा बालदिना निमित्त समाजातील दुर्लक्षित अनाथ मुलांना अन्नदान वाटप;

मुलांच्या शैक्षणिक,मुलभूत गरजा व त्यांचे हक्क देण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे एक पाऊल.. 

सोलापूर (प्रतिनिधी) :- बालदिनाचा दिवस म्हणजेच १४ नोव्हेंबर रोजी प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्री मो.सलमान आझमी व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव न्यायाधीश मा. उमेश देवर्षी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच लोकअभिरक्षक अँड देवयानी किणगी व अँड नवले, डॉ.अनुराधा मोकाशी यांच्या सहकार्याने इको नेचर क्लबचे पर्यावरण दुत डॉ मनोज देवकर, पत्रकार सुरक्षा समितीचे शहर अध्यक्ष तथा सारा न्यूजचे संपादक राम हुंडारे, इको नेचर क्लबचे समन्वयक उमा देगीनाल, सचिन बल्लाळ या सर्वांच्या उपस्थितीत बालदिन एक हात मदतीचा निमित्त विजापूर रोड भारती विद्यापीठ परिसरातील पारधी वसाहत येथील समाजातील दुर्लक्षित अनाथ मुलांना अन्नदान वाटप करण्यात आले. 



यावेळी जिल्हा विधी प्राधिकरण सेवा लोकाभिरक्षक अँड.देवयानी किणगी म्हणाल्या कि या समाजातील दुर्लक्षित मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून खूप समाधान वाटल आणि त्यांच्यासोबत थोडा वेळ गप्पा मारून त्यांचे  मनोगत ऐकून घेतले, एका दिवसाचा,एका तासाचा किंव्हा एका क्षणाचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर पाहून खूप समाधान वाटले. या मुलांना शिक्षणाच्या व समाजातील प्रवाहात आणण्यासाठी व नैतिक मुलभूत अधिकार देण्याचा प्रयत्न शासन दरबारी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

आज या बालकांना आजही स्वतःचा अस्तित्व निर्माण करताना अनेक अडचणी येतात अशा एका निराधार वसाहत या ठिकाणी आज बालदिन दिनानिमित्त मुलांसमवेत गोडधोड बरोबर त्या मुलांना स्वतःचा हक्क व शैक्षणिक तसेच मूलभूत गरजा शिक्षण व स्वतःचे हक्क मिळून देण्यासाठी जिल्हा विधी प्राधिकरण सेवा व इको नेचर क्लब कृतिशील पाऊल टाकत त्यांना त्यांचा हक्काचं नैतिक मूल्य अधिकार देण्याचा प्रयत्न करणार आहे. 

इको नेचर क्लब मार्गदर्शक समन्वयक अँड.देवयानी किणगी यांनी मुलांना खास पुलाव व गोड लाडू देऊन त्यांचा आनंद द्विगणित करण्याचा एक प्रयत्न केला आहे.


सौ. उमा देगीनाल यांचा पालावरच्या मुलांसोबत बालदिन साजरा.. 


तसेच आज बालदिनाच्या निमित्ताने नवीन RTO विजापूर रोड वरील पालावरच्या मुलांसोबत बालदिन साजरा करण्यात आला. त्या वेळी त्यांना दिवाळीचा फराळ वाटप करण्यात आले. 


यासाठी इको नेचर क्लबच्या माध्यमातून सौ उमा देगीनाल, पत्रकार सुरक्षा समितीचे शहर अध्यक्ष राम हुंडारे, इको नेचर क्लबचे मुख्य प्रवर्तक डॉ.मनोज देवकर, सचिन बल्लाळ व पालावरिल बालसंवगडी, मुले मुली व महिला उपस्थित होत्या


सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment