Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Thursday, October 2, 2025

SARA NEWS NETWORK



सारा न्यूज नेटवर्क - 

 जुळे सोलापूर प्रभाग क्रमांक 23 येथे जागतिक जेष्ठ नागरिक दिन साजरा करण्यात आला...


सोलापूर (प्रतिनिधी) :- दि. 1 आक्टोंबर 2025 ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त नंदनवन ज्येष्ठ नागरिक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने जुळे सोलापूर येथील जयकुमार नगर मधील श्री हनुमान मंदिरात येथे भाजपा सोलापूर शहर सचिव तथा माजी सहाय्यक आयुक्त श्री.प्रकाश राठोड यांच्या अध्यक्षतेखाली जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन साजरा करण्यात आला. नंदनवन ज्येष्ठ नागरिक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने अनेक ज्येष्ठ नागरिकांचे मानसन्मान आणि कार्याचा गौरव करण्यात आला.  सदर संस्था ही ISO मानांकन असलेली संस्था असून  सत्कारमूर्तीचे मानकरी श्री.भगवानराव चव्हाण (वय ९१ वर्षे), श्री.पदमाकर जाधव (वय ८८ वर्षे), श्री.विजयकुमार घोंगडे (वय ८३ वर्षे),  श्री.महादेव धसाडे (वय ७७ वर्षे), यांच्या कार्याचा गुणगौरव करून त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. 


                   सत्कारमूर्ती श्री भगवान चव्हाण यांनी माझे संपूर्ण जीवन हे शिक्षण क्षेत्रातील उत्तमशिक्षण निस्वार्थी व प्रामाणिक सेवा केल्याने आज आज अनेक यशस्वी विद्यार्थी घडविण्याचा आनंद होत आहे. याच सत्कर्मामुळे मी आज वय वर्षे ९१ झाले तरी ठणठणीत जगत आहे. असे मनोगत आतून व्यक्त केले. पुढे अध्यक्षीय भाषणात भाजपा शहर सचिव तथा माजी सहाय्यक आयुक्त श्री प्रकाश राठोड यांनी ज्येष्ठ नागरिकांचे प्रशंसा करत त्यांच्याबद्दल आदर व्यक्त केला. राठोड बोलले ज्येष्ठ नागरिक हे आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचे असतात. कारण त्यांच्या अनुभवातून अनेक गोष्टी शिकायला आणि अनुभवायला मिळतात. त्यांच्याच अनुकरणातून आपण जीवन जगत असतो. ज्येष्ठ नागरिकांनी सदैव सकारात्मक विचार विचार घेऊन जीवन जगावे. 



पुढे बोलताना ते आपल्या भागातील प्रत्येक जण कसा नगरसेवक होऊ शकतो, स्वतः च्या प्रभागाचा विकास स्वतः कसा करू शकतो हे MY SOLAPUR ॲपच्या माध्यमातून प्रभागातील समस्या, प्रलंबित कामे कशा प्रकारे सोडवता येतील हे उत्तम प्रकारे सर्व नागरिकांना समजावून सांगितले. जनसेवा हीच ईश्वर सेवा मानून प्रत्येकाने जेवढं जमेल तेवढे विविध माध्यमातून जनसेवा करावी ,जनतेच्या सेवेसाठी मी कायम तत्पर राहणारा आणि अविरत कार्य करणारा कार्यकर्ता असल्याचं सांगितले. तुमच्या हाकेला साथ देणं हे माझं कर्तव्य आहे म्हणून तुम्ही सेवा  फाउंडेशन कार्यालय सदैव लोकांची सेवा करण्यासाठी तत्पर असून  कधीही मला संपर्क करू शकता असे देखील म्हणाले. 

                  यावेळी कार्यक्रमात संस्थापक श्री.दत्तात्रय जामदार, संघटनेचे अध्यक्ष श्री.रवींद्र देसाई, श्री.आप्पासाहेब कोरे, श्री.मुकुंदराव घोरपडे, श्री.रोहिदास वाघमारे, श्री.अरविंद उंबरजे, श्री.शिवशरण गंगा, श्री.विठ्ठल कोळी, श्री.निलप्पा जवळकोटे सर, श्री.मोहन अनवेकर, श्री.गुरपादप्पा रोडगे व इतर सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. श्री.जवळकोठे सर यांनी आभार मानून सर्वांची मने जिंकली.


सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे 

No comments:

Post a Comment