Sara News Network

मुख्य संपादक - डॉ.राम हुंडारे

Wednesday, July 15, 2026

SARA NEWS NETWORK



सारा न्यूज नेटवर्क - 

 "सोलापूर जिल्ह्यातील बंजारा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही" - खासदार ज्योती वाघमारे

प्रकाश राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त 5000 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

श्री. प्रकाश राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त  सोलापूरमध्ये सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा उत्सव साजरा करण्यात आला.


10 जुलै - वाढदिवस सोहळा 

विजापूर रोडवरील अर्जुन टॉवर येथे संध्याकाळी भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शेकडो हितचिंतक, कार्यकर्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापून श्री. प्रकाश राठोड यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमात बंजारा समाजाची पारंपरिक गीते आणि नृत्ये सादर करण्यात आली. दुसऱ्या दिवशी प्रतापनगर तांडा येथे "भव्य गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा" आणि "5000 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप" कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. 


या कार्यक्रमासाठी उद्योगमंत्री उदय सामंत आणि राज्यसभा खासदार ज्योती वाघमारे यांना प्रमुख उपस्थिती म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. मात्र, मंत्री उदय सामंत यांना मुंबईला तातडीचे काम असल्याने ते उपस्थित राहू शकले नाहीत. 


खासदार ज्योती वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत, माजी गृहमंत्री सिद्धाराम म्हेत्रे आणि इतर मान्यवरांच्या साक्षीने हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमात आर्थिक दुर्बल घटकातील अनेक शाळेत जाऊन 5000 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.




खासदार ज्योती वाघमारे म्हणाल्या,

_"ज्याच्या नावातच 'प्रकाश' आहे असा व्यक्ती तुम्हाला मिळालेला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक बंजारा तांड्याचा विकास प्रकाश राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली होईल. त्या विकासासाठी लागणारा निधी मी कधीच कमी पडू देणार नाही, हा शब्द मी सर्व नागरिकांना देते."_


माजी गृहमंत्री सिद्धाराम म्हेत्रे म्हणाले,

_"शिवसेना पक्ष वाढवण्यासाठी 18 तास काम करणारा प्रकाश राठोड सारखा निष्ठावान शिवसैनिक कार्यकर्ता मिळणे हे आपले भाग्य आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली सोलापूरमध्ये पक्ष अधिक मजबूत होईल."_

शिक्षण हेच खरे सशक्तीकरण" या संदेशासह 5000 विद्यार्थ्यांना अनेक शाळेत या दोन दिवसांत बंजारा समाजासह सर्व समाजातील नागरिक एकत्र आले. सांस्कृतिक कार्यक्रमातून बंजारा समाजाची कला, संस्कृती आणि परंपरा जपण्याचा प्रयत्न. वाढदिवस फक्त सेलिब्रेशन न करता समाजसेवेच्या माध्यमातून साजरा करण्याचा नवा आदर्श. कार्यक्रमात मोठ्या संख्येने महिला आणि युवतींचा सहभाग. "बेटी बचाओ, बेटी पढाओ" ला प्रोत्साहन


यावेळी श्री. प्रकाश राठोड यांनी उपस्थितांचे आभार मानले आणि सांगितले, 

_"हा वाढदिवस माझ्यासाठी नसून सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक विद्यार्थ्यासाठी आणि तांड्यातील प्रत्येक कुटुंबासाठी आहे. पुढील काळात आम्ही शिक्षण, आरोग्य आणि रोजगार या तीन मुख्य मुद्द्यांवर काम करणार आहोत. प्रत्येक तांड्यातील मुलाला चांगले शिक्षण आणि युवकांना रोजगार मिळवून देणे हे आमचे ध्येय आहे."_


श्री. प्रकाश राठोड यांचा हा वाढदिवस केवळ वैयक्तिक सोहळा न राहता तो सोलापूर जिल्ह्यातील बंजारा समाजाच्या प्रगतीचा, शिक्षणाच्या संकल्पाचा आणि सामाजिक एकतेचा दिवस ठरला.

सदर कार्यक्रमाला माजी नगरसेविका शैलजा राठोड, नगरसेवक प्रियदर्शन साठे, ज्येष्ठ शिवसैनिक श्रीकांत बने, उपशहर प्रमुख अंकुश राठोड, शिवसेना युवासेना प्रमुख दिवाकर, उपजिल्हाप्रमुख अण्णा बासुरकर, डॉ. भाग्यश्री राठोड, राजेंद्र महाराज यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.






No comments:

Post a Comment