Sara News Network

मुख्य संपादक - डॉ.राम हुंडारे

Thursday, July 2, 2026

SARA NEWS NETWORK



सारा न्यूज नेटवर्क - 

 जागतिक डॉक्टर दिनानिमित्त मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. पल्लोलू यांचा सोलापूर जनता सहकारी बँकेकडून सत्कार  


सोलापूर, 2 जुलै 2026 :- जागतिक डॉक्टर दिनाचे औचित्य साधून सोलापूर जनता सहकारी बँक लि. सोलापूरच्या नियोजन व विकास विभागाने महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचा यथोचित सन्मान केला.  

आज 1 जुलै रोजी साजरा होणाऱ्या जागतिक डॉक्टर दिनानिमित्त बँकेचे नियोजन व विकास विभागाचे मुख्य अधिकारी मा. सिद्राम कामाठी व विभागीय अधिकारी मा. अमोल रामनवर यांनी सोलापूर महानगरपालिका आरोग्य विभागाच्या कोणापुरे चाळ नागरी आरोग्य केंद्रास सदिच्छा भेट दिली.  



यावेळी केंद्राचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी मा. डॉ. पल्लोलू वाय. एच. Sr यांना पुष्पगुच्छ देऊन तसेच लेखी हार्दिक शुभेच्छा पत्र प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला. डॉक्टर दिनानिमित्त आयोजित या छोटेखानी कार्यक्रमात बँक अधिकाऱ्यांनी केंद्रात रुग्णांना दिल्या जाणाऱ्या आरोग्य सेवा व सुविधांबाबत समाधान व्यक्त केले.  

या प्रसंगी केंद्रातील स्टाफ नर्स मा. शफगुता सिद्धिकी, MPW मा. मोईन शेख व महिला कर्मचारी सौ. सपना जाधव आदी कर्मचारी उपस्थित होते.  

डॉक्टरांचे समाजातील योगदान अत्यंत मोलाचे असून, कोविड काळापासून आजपर्यंत त्यांनी दिलेली सेवा अविस्मरणीय आहे, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.




No comments:

Post a Comment