सारा न्यूज नेटवर्क -
दारूच्या नशेने घेतला बळी, बॅरेलमध्ये सापडला मृतदेह;
बॅरेलमध्ये पडून पाटबंधारे विभागाच्या निवृत्त कर्मचाऱ्याचा मृत्यू..
निंबर्गी ( प्रतिनिधी - दक्षिण सोलापूर) :-
निंबर्गी येथे दारूच्या नशेमध्ये शेतातील वस्तीसमोर ठेवलेल्या पाणी भरलेल्या बॅरल मध्ये पडल्याने ६६ वर्षाच्या वृद्धाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना आज रविवारी सकाळी उघडकीस आली.
भिमराव धोंडीबा भालेकर (वय ६६) राहणार निंबर्गी (ता. द. सोलापुर) असे मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे. भीमराव भालेकर हे पाटबंधारे विभागात नोकरीस होते. पाच वर्षापुर्वी ते सेवानिवृत्त झाले होते. त्यांना दारु पिण्याचे व्यसन होते. मंद्रुप -निंबर्गी रस्त्यावरील शेतातील वस्तीवर ते राहत होते. काल रात्री ते दारू पिऊन वस्तीवर आले. त्यावेळी वस्तीवर कोणीही नव्हते. दारूच्या नशेत वस्ती समोर ठेवलेल्या बॅरेल मध्ये तोल जाऊन ते पडले.
बॅरैलच्या पाण्यात खाली मुंडके व वर पाय करून पाण्यात पडल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. आज सकाळी त्यांचे शेजारी असलेले बाळासाहेब सलगरे यांनी तुझे वडील वस्तीवर कुठे दिसत नाहीत. असे मुलगा दिनेश भालेकर याला फोन करून सांगितले. तेव्हा मुलगा दिनेश आणि वस्तीवर धाव घेतली.
तेव्हा वडील भीमराव हे पाण्याच्या बॅरलमध्ये खाली मुंडके वर पाय अशा अवस्थेत पडल्याचे दिसून आले. त्यानंतर शेजाऱ्यांच्या मदतीने बॅरेल मधून त्यांना बाहेर काढले. त्यानंतर ग्रामीण रुग्णालय मंद्रुप येथे आणले. तेव्हा येथील वैद्यकिय अधिकारी यांनी तपासुन उपचारापुर्वीच मृत्यू झाल्याचे सांगितले.
याप्रकरणी मुलगा दिनेश भालेकर यांनी मंद्रूप पोलिसात खबर दिली आहे. मंद्रुप पोलीस ठाण्यात याची नोंद झाली असून अधिक तपास ग्रेड पीएसआय संदीप काशीद करीत आहेत.

No comments:
Post a Comment