सारा न्यूज नेटवर्क -
118 झाडे तोडली, 1.22 कोटींमध्ये भुर्दंड.!
सोलापुरात वृक्षतोडीला आयुक्तांचा मोठा दणका;
तुमच्या भागात झाडे सुरक्षित आहेत का.?
सोलापूर : पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्यांना आता महापालिका आयुक्तांनी चांगलाच धडा शिकवला आहे. सलगर वस्ती परिसरात परवानगीशिवाय तब्बल 118 झाडांची कत्तल करणाऱ्या चौघांना तब्बल 1 कोटी 22 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण.?
• स्थळ : सलगर वस्ती परिसर, 54 मीटरलगतची खासगी जागा • गुन्हा : परवानगी न घेता 118 झाडांची तोड • आरोपी : जागा मालक राजेंद्र हजारे, आशा हजारे, शिवानंद पाटील आणि अंकित पाटील • कारवाई : महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांचा आदेश
15 दिवसांचा अल्टिमेटम
आयुक्त डॉ. ओम्बासे यांनी या चौघांना 15 दिवसांत दंडाची रक्कम भरण्याचे सक्त आदेश दिले आहेत. मुदतीत पैसे न भरल्यास थेट सात-बारा उताऱ्यावरच बोजा चढवला जाणार आहे. म्हणजे मालमत्ताच अडकणार!
पोलिसांत गुन्हा, मग दंड
या प्रकरणी आधी पोलिस ठाण्यात झाडतोडीचा गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर महापालिकेने नोटीस बजावून सुनावणी घेतली आणि मंगळवारी हा दणदणीत आदेश काढला.
सारा न्यूज नेटवर्कचा सवाल :
एका झाडामागे 1 लाखापेक्षा जास्त दंड! पर्यावरण वाचवायचं असेल तर असा धाक गरजेचाच. तुमच्या भागातही अशी बेकायदा वृक्षतोड होतेय का? आम्हाला कळवा.
झाड तोडाल, तर खिसा फाटणारच... सोलापूर महापालिकेचा स्पष्ट संदेश.!

No comments:
Post a Comment