सारा न्यूज नेटवर्क -
ज्ञान प्रबोधन विद्यालयला भारतीय संविधानाची प्रत भेट;
विद्यार्थिनी आदिती आसबे व पालकांचे कौतुक..
सोलापूर, ४ जुलै २०२६ :-
ज्ञान प्रबोधन विद्यालय, सोलापूर येथे संविधान जागृतीचा प्रेरणादायी उपक्रम राबवण्यात आला. इयत्ता 6 वी 'अ' वर्गातील विद्यार्थिनी कु. आदिती आसबे व तिच्या पालकांनी विद्यालयाला भारतीय संविधानाची प्रत भेट स्वरूपात दिली.
या उपक्रमामागील उद्देश विद्यार्थ्यांमध्ये संविधानाविषयी जागरूकता निर्माण करणे, लोकशाही मूल्यांची जपणूक करणे आणि राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ करणे हा आहे.
मुख्याध्यापिकांकडून गौरव
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. कोळेकर मॅडम यांनी आदिती व तिच्या पालकांचे मनःपूर्वक आभार मानले. त्या म्हणाल्या, "संविधान ही आपल्या देशाची सर्वोच्च आचारसंहिता आहे. ही भेट विद्यार्थ्यांमध्ये संविधानातील समता, बंधुता, स्वातंत्र्य आणि न्याय ही मूल्ये रुजवण्यासाठी निश्चितच मोलाची ठरेल."
सामाजिक बांधिलकीचे कौतुक
आदिती व तिच्या पालकांनी दाखवलेल्या सामाजिक बांधिलकीचे विद्यालयाने विशेष कौतुक केले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानापलीकडे जाऊन नागरिकत्वाचे भान येते, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
विद्यालयाने भविष्यातही पालकांचे असेच सहकार्य मिळत राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

No comments:
Post a Comment