सारा न्यूज नेटवर्क -
आज तुम्ही सत्कार घेता आहात, उद्या तुम्ही दुसऱ्याचा सत्कार कराल अशी कामगिरी करा.... प्रकाश राठोड
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक जयंतीनिमित्त सोलापूरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा, कृषिरत्न शेतकऱ्यांचा व सेवानिवृत्त/पदोन्नतीप्राप्त अधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाले
सोलापूर :- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, कृषीक्रांतीचे जनक व महाराष्ट्रात सलग अकरा वर्षे मुख्यमंत्री म्हणून कार्य भूषवले असे स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त सोलापूर शहर व जिल्ह्यातील बंजारा समाजासाठी प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
मा. श्री प्रकाशभाऊ राठोड, मा. सहाय्यक आयुक्त तथा विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली हा सोहळा संपन्न होणार आहे. "आयुष्य घडविताना" या करिअर मार्गदर्शन उपक्रमांतर्गत समाजातील गुणवत्ता, कर्तृत्व आणि सेवा यांचा गौरव करणे हा मुख्य उद्देश आहे.
*कार्यक्रमाचे *दिनांक*: बुधवार, 1 जुलै 2026 *वेळ*: सायंकाळी 4:00 वाजता स्थळ*: द्वारकाधीश मंदिर हॉल, इचगिरी मठ जवळ, विजापूर रोड, सोलापूर येथे कार्यक्रम संपन्न झाले.
*गुणवंत विद्यार्थी सत्कार* व करिअर मार्गदर्शन
शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये इ. 10वी/12वी परीक्षेत 70% पेक्षा अधिक गुण मिळवलेल्या बंजारा समाजातील विद्यार्थी-विद्यार्थिनींचा प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आले. तुमचे यश हे समाजासाठी प्रेरणा आहे. आपल्यातच उद्याचे अधिकारी, नेते, उद्योजक, संशोधक आणि समाजसेवक दडले आहेत.
*कृषिरत्न पुरस्कार*
सोलापूर मध्ये नाविन्यपूर्ण शेती, पाणी व्यवस्थापन, सेंद्रिय शेती व कृषी उत्पादनात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या सर्वोत्तम शेतकऱ्यांना "कृषिरत्न पुरस्कार" देऊन सन्मानित करण्यात आले
यामध्ये महादेव रोकडे,बसव संगम शेतकरी गट कल्लप्पा भतगुणकी, हत्तरसंग,गुरुपादप्प रोडगे, सोमनाथ हके बोलकवठा,प्रभाकर जाधव,शरद कुंभार, सहायक कृषी अधिकारी
*सेवा गौरव*
अलीकडेच पदोन्नती मिळालेल्या कर्मचारी-अधिकाऱ्यांचा तसेच सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या
अधिकारी-कर्मचाऱ्यांचा त्यांच्या प्रदीर्घ व निष्ठावान सेवेबद्दल सत्कार केले यामध्ये दत्तात्रय जामदार,विठ्ठल, भोसले,अप्पासाहेब कोरे,काशीनाथ राठोड,सुवर्णा कलशेट्टी,रजनी सोनवणे,
*शिक्षकरत्न सन्मान*
शाम जाधव,प्रा काशिद सर,हरीश पवार यांना प्रदान करण्यात आले,उद्योगरत्न सन्मान अजय गवसणे,विश्वलतरती कंपनी चेअरमन,श्रीकांत भरले,
*समाजरत्न पुरस्कार**
जीवनधारा पतसंस्था चेअरमन,राजेश चव्हाण तुळजाई अर्थमुवर,
वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत डॉ शरद जाधव कमल हॉस्पिटल, डॉ संतोष राठोड व डॉ सुनील वाघमारे युवराज मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांचा सन्मान करण्यात आला
या कार्यक्रमाला माजी. शिक्षणाधिकारी भांजे सर, उपशहर प्रमुख अंकुश राठोड माजी नगरसेविका शैलजा राठोड, नेहरू राठोड उमेश चव्हाण, राहुल राठोड दीपक पवार ,चंदू खडाखडे ,संतोष जाधव, विनोद राठोड याची उपस्थिती होती.



No comments:
Post a Comment