Sara News Network

मुख्य संपादक - डॉ.राम हुंडारे

Monday, July 13, 2026

SARA NEWS NETWORK




सारा न्यूज नेटवर्क - 

चेतक स्केटिंग क्लबच्या 84व्या शिबिराची स्केटिंग स्पर्धेने सांगता, तिरंगा बंगल्यात बक्षीस वितरण.. 

| सोमवार, 13 जुलै 2026

:- चेतक स्केटिंग क्लबच्या 100 दिवसांच्या 84व्या शिबिराचा समारोप नुकताच थाटात पार पडला. शिबिराच्या शेवटी आयोजित स्केटिंग स्पर्धेत मुला-मुलींसाठी 6 वयोगटांमध्ये चुरशीच्या स्पर्धा घेण्यात आल्या.


6 वर्ष, 9 वर्ष, 12 वर्ष, 15 वर्ष आतील व खुला गट अशा एकूण 6 गटांमध्ये या स्पर्धा वेगवेगळ्या पार पडल्या. लहानग्यांपासून ते तरुण खेळाडूंपर्यंत सर्वांनीच आपले कौशल्य पणाला लावले.



स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ तिरंगा बंगला येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. नगर रचना विभागाचे इंजिनियर श्री. अरविंद जगताप व क्लबचे प्रशिक्षक दिव्यकांत गांधी यांच्या हस्ते विजेत्या खेळाडूंना गोल्डन स्मृतिचिन्ह प्रदान करून गौरविण्यात आले.


या प्रसंगी सद्भावनाच्या सौ. रोशन शेख, सौ. सोना गांधी व श्रुती गांधी यांच्यासह मोठ्या संख्येने मुलांचे पालक उपस्थित होते. 


कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. शिबिरातून अनेक नवीन खेळाडू घडतील असा विश्वास प्रशिक्षक दिव्यकांत गांधी यांनी यावेळी व्यक्त केला.




No comments:

Post a Comment