सारा न्यूज नेटवर्क -
कर्तृत्वाची दखल; नितेश पुरारकर यांची रायगड जिल्हा क्राईम रिपोर्टर पदी निवड..
पत्रकार, मित्रपरिवार व हितचिंतकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव
रायगड, विशेष प्रतिनिधी : -
दैनिक सूर्योदयचे नांदवी/पुरार विभागाचे प्रतिनिधी नितेश पुरारकर यांच्या पत्रकारितेतील उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांची रायगड जिल्हा क्राईम रिपोर्टर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
दैनिक सूर्योदयचे संपादक भरत सरपरे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. नांदवी व पुरार परिसरातील विविध सामाजिक, विकासात्मक तसेच लोकहिताच्या प्रश्नांना सातत्याने वृत्तरूप देत नितेश पुरारकर यांनी अल्पावधीतच स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
• निर्भीड, वस्तुनिष्ठ आणि जबाबदार पत्रकारिता हे त्यांचे वैशिष्ट्य
• समाजसेवेची विशेष आवड असून विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग
• सर्वसामान्य नागरिकांशी सातत्याने संपर्क
दैनिक सूर्योदय व्यवस्थापनाने त्यांच्यावर रायगड जिल्हा क्राईम रिपोर्टरची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविली आहे. या नियुक्तीमुळे रायगड जिल्ह्यातील गुन्हेगारी तसेच जनहिताच्या प्रश्नांवरील वृत्तांकन अधिक प्रभावीपणे वाचकांपर्यंत पोहोचेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
नितेश पुरारकर यांच्या नियुक्तीबद्दल पत्रकार, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, मित्रपरिवार व हितचिंतकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.


No comments:
Post a Comment