Sara News Network

मुख्य संपादक - डॉ.राम हुंडारे

Wednesday, July 1, 2026

SARA NEWS NETWORK

 


सारा न्यूज नेटवर्क - 

सोलापूर: डॉ. शिरीष वळसंगकरांच्या कुटुंबातील संपत्तीचा वाद चिघळला;

 जावई सुजय फडकेंविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल


सोलापूर : - दिवंगत प्रसिद्ध मेंदूरोगतज्ज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या कुटुंबातील संपत्तीचा वाद आता विकोपाला पोहोचला आहे. डॉ. वळसंगकर यांचे जावई सुजय फडके यांच्या विरोधात सदर बाजार पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

काय आहे प्रकरण.?

जानेवारी 2026 ते जून 2026 या कालावधीत सुजय फडके यांनी नात्यातील एका महिलेला त्रास दिल्याचा आरोप आहे. पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार: 

• महिलेला घरातून येण्या-जाण्यास मज्जाव करण्यात आला • तिच्या परवानगीशिवाय घरात सीसीटीव्ही बसवण्यात आले • वीज आणि पाणी पुरवठा बंद करून मानसिक त्रास देण्यात आला 

या तक्रारीच्या आधारे सदर बाजार पोलिसांनी सुजय फडके यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा नोंदवला आहे. गेल्या 15 दिवसांपासून दोन्ही बाजूंकडून पोलीस ठाण्यात फेऱ्या सुरू होत्या. 


डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येनंतर वादाला सुरुवात

18 एप्रिल 2025 रोजी सोलापूरातील प्रसिद्ध न्युरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी आत्महत्या केली होती. त्यानंतर त्यांच्या संपत्तीवरून कुटुंबात वाद सुरू झाला. डॉ. वळसंगकर यांनी उभारलेले S P Institute of Neurosciences हे कर्नाटक, तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातील अत्याधुनिक न्यूरो हॉस्पिटल आहे. 

• वयाच्या 69 व्या वर्षी निधन 

• MBBS, MD, MRCP (UK) पदवीधर

 • 1999 मध्ये एसपीएम न्यूरो हॉस्पिटलची स्थापना

 • मेंदू विकारावरील संशोधनासाठी देश-विदेशात ख्याती

 • भारतभर प्रवासासाठी स्वतःचे विमान, शिकाऊ वैमानिकांना मार्गदर्शन 

पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. या वादामुळे सोलापूरच्या वैद्यकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.




No comments:

Post a Comment