सारा न्यूज नेटवर्क -
श्री वसंतराव नाईक हायस्कूल आणि समता मराठी विद्यालय सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने वसंतराव नाईक यांची जयंती उत्साहात साजरी
सोलापूर, १ जुलै २०२६: - मागास समाजसेवा मंडळ संचलित श्री वसंतराव नाईक हायस्कूल आणि समता मराठी विद्यालय, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आज महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व हरितक्रांतीचे प्रणेते स्व. श्री वसंतरावजी नाईक साहेब यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री कार्तिक चव्हाण सर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या शुभहस्ते स्व. वसंतरावजी नाईक साहेब व दलित मित्र स्व. चंद्राम चव्हाण गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. यावेळी नूतन पर्यवेक्षक म्हणून रुजू झालेले श्री पारदे सर यांचे प्रशालेच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी प्रशालेतील विद्यार्थिनी कुमारी खैरदी हिने वसंतराव नाईक यांच्या कार्याचा आढावा घेतला. सहशिक्षक श्री पवार एस.आर. सर, श्री शिवशरण सर, श्री देशमाने सर यांनी नाईक साहेबांच्या कृषी क्षेत्रातील योगदानावर व हरितक्रांतीतील भूमिकेवर प्रकाश टाकत आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री कार्तिक चव्हाण सर यांनी अध्यक्षीय मनोगतातून विद्यार्थ्यांना नाईक साहेबांच्या विचारांचा वारसा जपण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. लता पवार मॅडम यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री गायकवाड सर यांनी केले. या कार्यक्रमास दोन्ही विद्यालयांतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:
Post a Comment