*जेलरोड पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री उदयसिंह पाटील यांचा पत्रकार सुरक्षा समिती वतीने सत्कार*
सोलापूर (प्रतिनिधी ) जेलरोड पोलीस ठाण्याचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील यांनी नुकताच पदभार स्वीकारला असून पत्रकार सुरक्षा समितीच्या शिष्टमंडळाने जेलरोड पोलीस ठाणे या ठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील यांची भेट घेऊन शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला यावेळी बोलताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक पाटील म्हणाले की जेलरोड पोलीस ठाणे हद्दीत सामाजिक सलोखा कायदा व सुव्यवस्था राखून गुन्हेगारी कमी करण्याचा माझा प्रयत्न राहील त्याचबरोबर पोलिसिंग यांच्या माध्यमातून गुन्हेगारावर नियंत्रण व वचक ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल या प्रसंगी पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष कलीम शेख जिल्हा संघटक अरुण सिडगिद्दी सोलापूर शहर अध्यक्ष आन्सर तांबोळी कार्याध्यक्ष राजू वग्गू समन्वयक लक्ष्मण सुरवसे सचिव गणेश निंबाळकर प्रसिद्धी प्रमुख अमोल कुलकर्णी दत्तात्रय बनसोडे संदीप धोत्रे महंमद तांबोळी इत्यादी पत्रकार उपस्थित होते.

No comments:
Post a Comment