सारा न्यूज नेटवर्क -
नूतन वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब बिराजदार यांचा पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने सत्कार..
सोलापूर (प्रतिनिधी) : - एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी भाऊसाहेब बिराजदार यांनी नुकताच पदभार स्वीकारला. या पार्श्वभूमीवर पत्रकार सुरक्षा समितीच्या शिष्टमंडळाने त्यांची सदिच्छा भेट घेतली.
एमआयडीसी पोलीस ठाणे येथे झालेल्या या भेटीदरम्यान शिष्टमंडळाच्या वतीने वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब बिराजदार यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी बिराजदार यांना पुढील प्रशासकीय वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष कलीम शेख, सोलापूर जिल्हा अध्यक्ष डॉ.राम हुंडारे, जिल्हा संघटक अरुण सिडगिद्दी, सोलापूर शहर अध्यक्ष आन्सर तांबोळी, कार्याध्यक्ष राजू वग्गू, समन्वयक लक्ष्मण सुरवसे, सचिव गणेश निंबाळकर यांच्यासह विष्णू सकट, संदीप धोत्रे, दत्तात्रय बनसोडे, महंमद तांबोळी, श्याम वायदंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
नवनियुक्त पोलीस निरीक्षक बिराजदार यांनीही पत्रकारांसोबत संवाद साधत पोलीस आणि पत्रकार यांच्यातील समन्वय अधिक दृढ करण्यावर भर दिला जाईल, असे आश्वासन दिले.


No comments:
Post a Comment